Homeइतरडॉ. संजय डी. पाटील : दूरदृष्टीचे गतिशील नेतृत्व!

डॉ. संजय डी. पाटील : दूरदृष्टीचे गतिशील नेतृत्व!

कोल्हापूर :
      डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा आज (दि.१८ फेब्रुवारी) वाढदिवस. शिक्षण, उद्योग आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या डॉ. संजय डी. पाटील यांना ६२व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
डॉ. संजय डी. पाटील हे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आचार-विचाराने वाटचाल करीत आहेत. डॉ. संजय डी. पाटील यांच्यासारखे दूरदृष्टी असणारे गतिशील नेतृत्व एज्युकेशन सोसायटीला लाभले. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य अवर्णनीय तसेच गुणवत्ता सिद्ध करणारे आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शिक्षणाचा ज्ञानदीप लावला. त्यामुळे काही पिढ्या उजळून निघाल्या हे खरे असले, तरी डॉ. संजय डी. पाटील यांनी हा ज्ञानदीप अखंडित, अविरत तेवत ठेवण्याचे महान कार्य केले आहे. हे काम ते निष्ठेने करताना पाहायला मिळते. डॉ. डी. वाय. पाटील यांचा आदर्श, दृष्टिकोन, दूरदृष्टी पुढील काळात सत्यात उतरविण्यासाठी ते अथक प्रयत्न करीत आहेत.
डॉ. संजय डी. पाटील अनेक शैक्षणिक संस्था चालवितात, ज्यात वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय आणि मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. असंख्य शैक्षणिक संस्था चालविणे व त्या गुणवत्तेच्या कसोटीवर सर्वोत्तम बनविणे हे काम अवघड आहे; पण डॉ. संजय डी. पाटील यांनी सर्वोत्तम गुणवत्ता, सर्वोत्कृष्ट दर्जा राखत या संस्थांची वाटचाल ठेवली आहे. यातूनच त्यांची वैचारिक प्रगल्भता, व्यापक दूरदृष्टी व संशोधक वृत्ती पाहायला मिळते.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
25 ° C
25 °
25 °
69 %
1.5kmh
0 %
Wed
25 °
Thu
26 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page