• किशोर वसंत चव्हाण यांचा पाच फुटाचा इगवाना सरडा हा ‘बेस्ट ऑफ द शो’
कोल्हापूर :
भिमा कृषी प्रदर्शनात चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल ही झाली. तर बचत गटाच्या माध्यमातून २५ लाखाची उलाढाल झाली. बेगम राजू मुजावर यांनी बिर्याणीमधून १ लाख १० हजार रुपये विक्री केली. अमृता उमेश भोकरे यांनी १ लाख रुपयाचे मासे विकले तर ज्योती धावडे यांनी ५४ हजार ७०० रुपयांची विक्री केली. कल्याणी भिमगोंडा यांनी ४२ हजार रुपयांच्या वस्तू विकल्या. या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रगतशील शेतकरी सर्जेराव धनवडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई कांदिवलीच्या किशोर वसंत चव्हाण यांचा पाच फुटाचा इगवाना सरडा हा ‘बेस्ट ऑफ द शो’ ठरला तर कुलदीपसिंह बळीराम लाड (रा. माळसोना ता. जिल्हा परभणी) यांचा लाल कंधारी वळू हा ‘चॅम्पियन ऑफ द शो’ ठरला आहे.
शेतकऱ्यांना प्रगतशील करण्याचे काम सरकार करत आहे. शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआयमध्ये असल्याचे उद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात काढले. खा. धनंजय महाडिक यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ उभे केल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, खासदार धनंजय महाडिक दरवर्षी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवतात आणि नवनवीन माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात या प्रदर्शनाचा लाभ अनेक शेतकरी घेतात. मात्र शेतकऱ्यांनी याचा उपयोग आपल्या शेतीसाठी करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादनावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक करताना खासदार धनंजय महाडिक यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. किसान योजनेचा १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. साडेचार लाख करोड रुपये या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले गेले आहेत असे सांगितले. अनेक योजनांच्या माध्यमातून २७ प्रकारचे व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोअरेजसाठी ९० टक्के सबसिडी दिली गेली आहे, त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी विविध मान्यवर व भिमा कृषी पशु पक्षी प्रदर्शनाच्या पशुसंवर्धन संयोजक कमिटीच्या डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनिल काटकर, डॉ. निवृत्ती पाटील, विलास इंगवले, सर्जेराव धनवडे, दिलीप दळवी, सुजित चव्हाण, अशोक सिध्दनेर्ले, किरण रणदिवे, किरण सुर्यवंशी आदींचा सन्मान करण्यात आला.
——————————
भिमा कृषी प्रदर्शनात चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
2.1kmh
20 %
Wed
25
°
Thu
26
°
Fri
27
°
Sat
28
°
Sun
26
°

