Homeकला - क्रीडालुसोफोन (पोर्तुगीज) चित्रपट महोत्सव आजपासून

लुसोफोन (पोर्तुगीज) चित्रपट महोत्सव आजपासून

• शिवाजी विद्यापीठात दि. ११ ते १३ फेब्रुवारीपर्यंत महोत्सव
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा अधिविभाग, पोर्तुगाल वाणिज्य दूतावास आणि द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज, लिस्बन, पोर्तुगाल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘फेस्त-इन’च्या सहकार्याने १४व्या लुसोफोन चित्रपट महोत्सवाचे आयोजन दि. ११ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. हा महोत्सव निलांबरी हॉल, वनस्पतीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे होणार आहे.
या महोत्सवात पोर्तुगाल, ब्राझील, फ्रान्स, नेदरलँड्स, ग्रेट ब्रिटन व साओ टोमे अँड प्रिन्सिपे या देशांतील दर्जेदार लघुपट, माहितीपट, डॉक्यु-फिक्शन व फीचर फिल्म्सचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. लुसोफोन देशांतील सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानवी भावभावनांचे विविध पैलू या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर उलगडले जातील.
दि. ११ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता द कमॉइश इन्स्टिट्यूटचे डॉ. डेल्फिम कोरेइया द सिल्वा, गोवा यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ होणार असून त्यानंतर लगेच ‘दि मेमरी ऑफ द स्मेल ऑफ थिंग्स’ आणि ‘सुसुआराना’  या चित्रपटांचे प्रदर्शन होईल. दि. १२ व १३ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत चित्रपट प्रदर्शन होईल. यामध्ये ‘ओल्ड मॅन ऑफ रेस्तेलो’, ‘न्तेरेगू (दि अन्टेमेबल)’, ‘ब्युटिफुल बान्झो’, ‘आवर किंगडम’, ‘ब्युटिफुल अमेरिका’, ‘दि पोर्तुगीज’, ‘दि सोल्जर फ्रॉम गोवा’, ‘दि डेल्फिन’ हे चित्रपट, माहितीपट व लघुचित्रपट दाखवले जाणार आहेत.
पोर्तुगीज भाषा ही जगातील पाचवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पोर्तुगाल बरोबरच ब्राझील, अंगोला, केप वर्दे, साओ टोमे आणि प्रिंसिपे, गिनी बिसाऊ, मोझांबिक, इक्वेटोरियल गिनी आणि ईस्ट तिमोर या देशांची ती अधिकृत भाषा आहे. या देशांशी भारताचे व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विविध संस्कृती, भाषा आणि समाज समजून घेण्याचे प्रभावी माध्यम आहे. हे चित्रपट प्रदर्शन विनामुल्य असून कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी व रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
53 %
1.5kmh
37 %
Tue
26 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page