कोल्हापूर :
मानवी समस्या सोडविण्यासाठी भूस्थानिक तंत्रज्ञान उपयोगी आहे , असे प्रतिपादन नागपूर येथील क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र (आर.आर.एस.सी.) या संस्थेच्यावतीने विवेकानंद कॉलेजमध्ये भूमाहितीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी या संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवासन यांनी केले.
ते पुढे म्हणाले भूस्थानिक तंत्रज्ञान (Geospatial Technology) म्हणजे हे पृथ्वीवरील ठिकाणाशी संबंधीत माहिती गोळा करणे ती साठविणे आणि तिचे विश्लेषण करणे आणि प्रदर्शित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा समूह होय. हे तंत्रज्ञान आपल्याला पृथ्वीच ठिकाणाबद्दल माहिती मिळवून ती समजून घेऊन तिचा वापर चांगले निर्णय घेण्यासाठी मदत करते. रस्ते शोधणे, जंगलांची स्थिती तपासणे, शहरांसाठी योजना आखणे यासाठी उपयुक्त आहे.
यावेळी डॉ. प्रकाश राव यांनी भूस्थानिक तंत्रज्ञानामध्ये उपयुक्त असणाऱ्या सुदूर संवेदन व अंकीय प्रतिमा प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले. डॉ. साधना जैन यांनी चांद्रमोहिमेवर तसेच डॉ. शर्मा यांनी थ्रीडी लॅबची माहिती दिली.
विवेकानंद कॉलेजच्या भूमाहिती शास्त्र विभागाने नागपूरला अभ्यास सहलीचे आयोजन केले होत. त्यामध्ये ४० विद्यार्थी सहभागी होते. त्यांनी निरी, एमआरसॅक, आरआरएसी, सीव्हीरामण म्युझियम, झिरो माईल स्टोन या स्थळांना भेटी दिल्या. सहल संयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात व भूगोल विभागप्रमुख डॉ. गोवर्धन उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एच. पी. पाटील, डॉ. वैशाली पालकर यांनी केले. डॉ. शुभांगी काळे, डॉ. निशा सुर्वे, डॉ. विठृल पाटील, डॉ. एस. एस. घोडेराव व प्रा. अश्विनी मुरावणे यांचे सहकार्य लाभले.
मानवी समस्या सोडविण्यासाठी भूस्थानिक तंत्रज्ञान उपयोगी : डॉ. श्रीनिवासन
RELATED ARTICLES
Mumbai
haze
23
°
C
23
°
23
°
73 %
2.1kmh
18 %
Sun
24
°
Mon
24
°
Tue
25
°
Wed
26
°
Thu
25
°

