कोल्हापूर :
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनसाठी देशभरातून असंख्य भाविक कोल्हापूरात येतात. या भाविकांना गेली १८ वर्षे श्री महालक्ष्मी अन्नछत्र येथे मोफत भोजनप्रसाद देण्याचे कार्य निरंतर सुरु आहे. सरत्या वर्षात सुमारे १५ लाख भाविकांनी श्री महालक्ष्मी अन्नछत्रात मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेतला. प्रचंड गर्दी असूनही सर्वांना सात्विक आणि चविष्ट भोजनप्रसाद मिळाल्यामुळे भाविकांनी खूप समाधान व्यक्त केले.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीच्या दर्शनसाठी सध्या वर्षभर भाविकांची गर्दी असते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर या सर्व भाविकांची पाऊले आपोआपच मोफत भोजनप्रसाद घेण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्राकडे वळतात. या भाविकांना गेली १८ वर्षे श्री महालक्ष्मी अन्नछत्र येथे मोफत भोजनप्रसाद सुरु आहे. निरंतरपणे सुरू असलेल्या या अन्नछत्रात भाविक प्रसादाचा लाभ घेतात. सन २०२५ मध्ये सुमारे १५ लाख भाविकांनी श्री महालक्ष्मी अन्नछत्रात मोफतभोजनप्रसादाचा लाभ घेतला. प्रचंड गर्दी असूनही सर्वांना सात्विक आणि चविष्ट भोजनप्रसाद मिळाल्यामुळे भाविकांनी खूप समाधान व्यक्त केले.
याबरोबरच श्री महालक्ष्मी धर्मशाळेत भाविकांची अल्पदरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वर्षात सुमारे २ लाख भाविकांची राहण्याची व्यवस्था श्री महालक्ष्मी धर्मशाळेत करण्यात आली. सर्व आधुनिक सोयीसुविधा असूनही कमी दरात राहण्याची उत्तम व्यवस्था झाल्याने भाविक समाधानाने घरी परतले.
श्री महालक्ष्मी अन्नछत्र आणि श्री महालक्ष्मी धर्मशाळेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व यंत्रणा कार्यरत होती. याकामी संजय जोशी, राजेश सुगंधी, ॲड. तन्मय मेवेकरी, प्रशांत तहसीलदार, चंद्रशेखर घोरपडे, विराज कुलकर्णी, आदित्य मेवेकरी, सुनील खडके, प्रतिक गुरव, रजत जोशी, अतिश जाधव, ऋतुराज सरनोबत या पदाधिकाऱ्यांबरोबर ७५ कर्मचारी कार्यरत होते. यामुळेच एवढी गर्दी असून देखील भाविकांची उत्तम व्यवस्था झाली.
——————————
सरत्या वर्षात १५ लाख भाविकांनी घेतला श्री महालक्ष्मी अन्नछत्राचा लाभ
Mumbai
scattered clouds
24.8
°
C
24.8
°
24.8
°
61 %
8.3kmh
31 %
Fri
25
°
Sat
25
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
26
°

