कोल्हापूर :
मोर्डे फाउंडेशन आयोजित व फिडे, एआयसीएफ, एमसीए, पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मोर्डे फाउंडेशन दुसऱ्या अखिल भारतीय खुल्या फिडे रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत ग्रँड मास्टर अभिमन्यू पुराणिकने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले.
मंचर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत ग्रँड मास्टर अभिमन्यू पुराणिकने महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणेला बरोबरीत रोखले व ८ गुण (६० बुकोल्स कट गुण सरासरीच्या) सह विजेतेपद पटकावले. तर, दुसऱ्या पटावरील सामन्यात सृजित पॉलने मोहम्मद शेखचा पराभव करून ८ गुण व ५४.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर दुसरा तर अनिरुद्ध पोटावड याने शेजल संजयवर विजय मिळवत ७.५ गुण व ५६.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर तिसरा क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व ६०,००० रुपये तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व ४०,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोर्डे फूड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक व स्पर्धा संचालक हर्षल मोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीए मदन देशपांडे, डॉ. आशिष पोखरकर, विक्रम कोकणे, विशाल गावडे, चीफ आरबीटर आयए दिप्ती शिदोरे, आयए अथर्व गोडबोले, आयए श्रद्धा विंचवेकर आणि आयए आम्रीश टल्लू आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय खुल्या फिडे रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत अभिमन्यू पुराणिक विजेता
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.9
°
C
24.9
°
24.9
°
58 %
2.5kmh
1 %
Sun
25
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
26
°

