• अण्णा मोगणे संघ उपविजेता
कोल्हापूर :
फायटर्स स्पोर्टस् क्लब आयोजित कै. प्रा. संजय देसाई स्मृतीचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शिवनेरी स्पोर्ट्सने अण्णा मोगणे संघाचा ३६ धावांनी पराभव करून संजय देसाई स्मृतीचषक पटकाविला. अण्णा मोगणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून विशाल पाटील (शाहू स्पोर्ट्स) याला गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात अनिकेत नलवडे (शिवनेरी स्पोर्ट्स) सामनावीर ठरला.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी स्पोर्ट्स संघाने २० षटकात ६ बाद १६२ धावा केल्या. त्यामधे अनिकेत नलवडे ७१ धावा व विवेक पाटील याने ३२ धावा केल्या. अण्णा मोगणे संघाकडून गोलंदाजी करताना वरद माळी ३ बळी व सूरज जाधव याने २ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अण्णा मोगणे संघ १८ षटकात सर्वबाद १२६ धावा करू शकला. त्यामधे श्रीराज चव्हाण ३३ धावा व प्रणय आरमारकर २३ धावा केल्या. शिवनेरी स्पोर्ट्सकडून गोलंदाजी करताना रोहित पाटील ४ बळी, प्रथमेश हेगाणा व सौरभ कोटालगी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. अशाप्रकारे शिवनेरी स्पोर्ट्सने ३६ धावांनी विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे आणि उद्योजक अविनाश चिकणीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्वागत क्लबचे अध्यक्ष उमेश माने यांनी तर आभार राजू पठाण यांनी मानले. प्रा. संजय पाठारे यांनी सूत्रसंचालन केले. बक्षीस वितरण समारंभास अशोक पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ. राजेंद्र रायकर, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे असिस्टंट रजिस्ट्रार
अजित पाटील, उद्योजक मिलिंद पाटील, चेतन पाटील, अरुण सावंत, विठ्ठल भोसले, विनय पाटील, संजय कवडे उपस्थित होते.
पंच म्हणून रहीम खान आणि अनिल सांगावकर तर पंचम मोरे यांनी स्कोअरर म्हणून काम पाहिले.
संजय देसाई स्मृतीचषक स्पर्धेत फायटर्स स्पोर्टस् क्लब विजेता
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.5
°
C
24.5
°
24.5
°
52 %
4.8kmh
1 %
Sat
24
°
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°

