Homeकला - क्रीडाबुद्धीबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर १० खेळाडू संयुक्तरीत्या आघाडीवर

बुद्धीबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर १० खेळाडू संयुक्तरीत्या आघाडीवर

कोल्हापूर :
मोर्डे फाउंडेशनच्यावतीने आयोजित व फिडे, एआयसीएफ, एमसीए, पीडीसीसी यांच्या यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मोर्डे फाउंडेशन दुसऱ्या अखिल भारतीय खुल्या फिडे रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर ग्रँड मास्टर अभिमन्यू पुराणिक, मोहम्मद शेख, सृजित पॉल, अनिरुद्ध पोटावड, अलौकिक सिन्हा, आकाश दळवी, कैवल्य नागरे, कल्पेश दिवांग, श्लोक माळी, मिहिर सरवदे यांनी ४ गुणांसह संयुक्तरित्या आघाडी घेतली आहे.
मंचर येथे जीवन मंगल कार्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत चौथ्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत अभिमन्यू पुराणिकने निशांत जवळकरचा, तर अलौकिक सिन्हाने विरेश शरणार्थीचा पराभव करून ४ गुणांची कमाई केली. कल्पेश देवांग याने महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे वर सनसनाटी विजय मिळवत ४ गुण मिळवले. मोहम्मद शेखने भुवन शितोळेला पराभूत करून 4गुण प्राप्त केले. सृजित पॉलने ओम रामगुडेचा, तर अनिरुद्ध पोटावडने थंगराज नाडरचा पराभव केला.
स्पर्धेत एकूण २४६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून यामध्ये १२३ रेटेड खेळाडूंचा समावेश आहे. याआधी स्पर्धेचे उदघाटन राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोर्डे फूड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक व स्पर्धा संचालक हर्षल मोर्डे, स्पर्धेचे मेंटॉर ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, आशिष पोखरकर, विक्रम कोकणे, विशाल गावडे, चीफ आरबीटर आयए दिप्ती शिदोरे, आयए अथर्व गोडबोले, आयए श्रद्धा विंचवेकर आणि आयए आम्रीश टल्लू आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
38 %
2.8kmh
64 %
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page