Homeशैक्षणिक - उद्योग पोदार प्रेप, कोल्हापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनातून भारतीय संगीत वारशाचा उत्सव

पोदार प्रेप, कोल्हापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनातून भारतीय संगीत वारशाचा उत्सव

कोल्हापूर :
भारत विविधतेने नटलेला देश असून, प्रत्येक प्रदेशाची ओळख त्याच्या पारंपरिक वाद्यसंगीतातून उमटते. मात्र आजच्या डिजिटल युगात मुलांचा संपर्क प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक संगीताशी होत असून, पारंपरिक भारतीय वाद्यांचे आकर्षण हळूहळू कमी होत आहे. या सांस्कृतिक वारशाशी लहान वयातच नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने पोदार प्रेप, कोल्हापूर वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६ साजरे करण्यात आले. यावर्षीचा संमेलनाचा विशेष अनोखा विषय ‘जंबो के साथ – सुर और साज का संगम’ हा होता.
‘जंबो के साथ – सुर और साज का संगम’ या कार्यक्रमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पालकांना भारतभरातील सुरेल प्रवास घडवून आणला. विविध राज्यांतील पारंपरिक वाद्ये, त्यांचे स्वर, त्या मागील कथा, वापरले जाणारे साहित्य तसेच सण-समारंभांमधील महत्त्व यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी रंगतदार नृत्य व सादरीकरणांतून केले.
या स्नेहसंमेलनाच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांनी १० दिवसांचा अभ्यासपूर्ण उपक्रम पूर्ण केला. या कालावधीत त्यांनी विविध भारतीय वाद्यांची माहिती घेतली. ती कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, कोणत्या प्रसंगी वाजवली जातात याची ओळख करून घेतली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी साध्या साहित्याचा वापर करून वाद्यांची मॉडेल्स तयार केली, ज्यामुळे कला, संगीत व संस्कृती यांचा सुंदर संगम घडून आला.
या अनुभवाधारित उपक्रमांमुळे मुलांची सर्जनशीलता, सूक्ष्म हालचालींचे कौशल्य, तालबद्धता व सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाली. त्यामुळे हे स्नेहसंमेलन केवळ एक सादरीकरण न राहता, अर्थपूर्ण शिक्षणाचा व भारतीय सांस्कृतिक वारशाच्या उत्सवाचा अविस्मरणीय अनुभव ठरला. ‘जंबो के साथ – सुर और साज का संगम’ या संकल्पनेतून पोदार प्रेपची अनुभवाधारित शिक्षणपद्धती ठळकपणे प्रतिबिंबित झाली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
22.8 ° C
22.8 °
22.8 °
42 %
3.9kmh
16 %
Sat
25 °
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °

Most Popular

You cannot copy content of this page