• आमदार सतेज पाटील यांचा टोला
कोल्हापूर :
सगळ्या वाईट काळात काँग्रेसशी व आमच्याशी एकनिष्ठ असणाऱ्यांना कोल्हापूर महानगरपालिकेत उमेदवारी देऊ शकलो. शेवटच्या घटकाला दोन-तीन लोकांसाठी ॲडजेसमेंट करावी लागली. पण, ९९ टक्के आमची यादी ही निष्ठावंतांचा मेळा आहे. महायुतीला मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करता आली नाही. त्यांनी कोल्हापुरातील लोकांचा विश्वास संपादन करण्याआधी स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा, असा टोला काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, जे स्वत:चे उमेदवार ठरवू शकत नाहीत ते विकासकामे काय करणार आहेत. महायुतीला स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करता आला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत यादी जाहीर करता आली नाही. याचा अर्थ कार्यकर्त्यांवर त्यांची पकड नाही. स्वत:च्या कार्यकर्त्यांना जे न्याय देऊ शकले नाहीत ते कोल्हापूर शहरातील नागरिकांना काय न्याय देणार असा सवाल आमदार पाटील यांनी केला.
——————————
महायुतीने आधी स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा
Mumbai
scattered clouds
24.8
°
C
24.8
°
24.8
°
61 %
8.3kmh
31 %
Fri
25
°
Sat
25
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
26
°

