कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येऊन ‘राजर्षी छत्रपती शाहू आघाडी’ तयार केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी २५, आप २५ आणि वंचित ३१ जागा लढविणार आहे. या आघाडीच्यावतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी (दि. २७) झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, ‘आप’चे संदीप देसाई व ‘वंचित’चे अरुण सोनवणे यांनी ही नांवे जाहीर केली.
‘राजर्षी छत्रपती शाहू आघाडी’कडून जाहीर झालेल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)कडून प्रभाग २ ड – मकरंद अरूण जोंधळे (सर्वसाधारण), ६ क – सौ. धनश्री गणेश जाधव (सर्वसाधारण महिला), १० ड – चंद्रकांत पांडुरंग सूर्यवंशी (सर्वसाधारण), १३ ड – दिशा निरंजन कदम (सर्वसाधारण) – १६ अ – गणेश चंद्रकांत नलवडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), १७ क – रंजिता नारायण चौगुले (सर्वसाधारण महिला), १९ अ – दिनकर लक्ष्मण कांबळे (अनुसूचित जाती), १९ ब – रूपाली अमोल बावडेकर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), २० क – प्रा. हर्षल हरिदास धायगुडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग).
‘आप’कडून प्रभाग २ ब – उषा मारुती वडर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), ५ अ – समीउल्ला ऊर्फ समीर लतिफ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), ८ ब – दीप्ती अनिकेत जाधव (सर्वसाधारण महिला), १३ क – मोईन इजाज मोकाशी (सर्वसाधारण), १७ ब – प्रसाद विजय सुतार (नागरिकांचा मागास प्रवर्ग), १८ ब – अश्विनी सूरज सुर्वे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), १८ क – डॉ. कुमाजी गजानन पाटील (सर्वसाधारण) असे उमेदवार आहेत.
‘वंचित’कडून प्रभाग १३ अ – राजश्री गणेश सोनवणे (अनुसूचित जाती महिला), १८ क – अमित पांडुरंग नागटिळे (सर्वसाधारण), १७ ड – प्रवीण अर्जुन बनसोडे (सर्वसाधारण), १६ ड – राहुल विठ्ठल सोनटक्के (सर्वसाधारण), ११ अ – पायल सागर कुरडे (अनुसूचित जाती महिला), १४ क – देवेंद्र विठ्ठल कांबळे (सर्वसाधारण), ३ ड – आकाश शामराव कांबळे (सर्वसाधारण) या उमेदवारांचा समावेश आहे.
——————————
राष्ट्रवादी, आप आणि वंचित आघाडीकडून पहिली यादी जाहीर
Mumbai
scattered clouds
24.8
°
C
24.8
°
24.8
°
61 %
8.3kmh
31 %
Fri
25
°
Sat
25
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
26
°

