Homeकला - क्रीडा'शिवाजी'ची विजयी घोडदौड

‘शिवाजी’ची विजयी घोडदौड

• फुलेवाडीकडून सुभाषनगर पराभूत
कोल्हापूर :
पूर्णवेळेत सामन्यावर वर्चस्व ठेऊनही गोलसंख्या वाढवण्यात अपयशी ठरलेल्या शिवाजी तरुण मंडळने बालगोपाल तालीम मंडळवर २-०ने विजय मिळवला. सलग चौथा विजय साकारत ‘शिवाजी’ने आपली घोडदौड सुरू ठेवत एकूण १२ गुणांवर झेप घेतली आहे. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर १-० गोलने निसटता विजय मिळवला.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. दुपारच्या सत्रात शिवाजी विरूध्द बालगोपाल सामना झाला. सामना सुरु होताच ‘शिवाजी’कडून खोलवर चढाई झाली पण गोल होऊ शकला नाही. त्यानंतर झालेल्या चढाईत करण चव्हाण-बंदरेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकून पुन्हा मैदानात आला. रिबॉन्ड झालेल्या चेंडूला संकेत नितीन साळोखेने हेडव्दारा गोलजाळ्याची दिशा दाखवली. चौथ्या मिनिटाला ‘शिवाजी’चा पहिला गोल फलकावर झळकवला. पहिल्या पाच मिनिटांत दोन कॉर्नर किक मिळाल्या परंतु त्याचा लाभ उठवता आला नाही. पहिली १५ मिनिटे बालगोपालच्या क्षेत्रातच चेंडू राहिला. यानंतर बालगोपालकडून अभिनव साळोखे, देवराज मंडलिक, प्रणव गायकवाड, विश्वविजय घोरपडे, सुजित राजगोपालन, रुद्रेश धुमाळ यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी वाया गेल्या. ‘शिवाजी’कडून झालेल्या चढाईत हर्ष जरगच्या तीन ते चार सोप्या संधी वाया गेल्या. त्यांच्या करण चव्हाण-बंदरे, संकेत साळोखे, यश जांभळे, संकेत जरग यांना फिनिशिंगअभावी गोल नोंदवण्यात यश आले नाही. एका चढाईत हर्ष जरगच्या पासवर यश जांभळेने गोल नोंदवून ३९व्या मिनिटाला आघाडी २-० अशी वाढवली.
पूर्वार्धात मिळालेल्या २-० गोलच्या आघाडीमुळे उत्तरार्धात ‘शिवाजी’कडून वेगवान व खोलवर चाली रचल्या गेल्या. करण चव्हाण-बंदरे, यश जांभळे, हर्ष जरग, संकेत साळोखे, संकेत जरग, सिध्देश साळोखे यांनी एकापाठोपाठ एक चाली रचल्या. बालगोपालच्या गोलक्षेत्रात जोरदार चढाया झाल्या पण कोणालाही गोलची आघाडी वाढवता आली नाही. बालगोपालच्या रुद्रेश धुमाळने एका चढाईत मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी वाया गेली. अखेर पूर्वार्धातील २-० गोलची आघाडी कायम राखून ‘शिवाजी’ने सलग चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
फुलेवाडीचा निसटता विजय…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात फुलेवाडीने सुभाषनगरवर १-० गोलने निसटता विजय मिळवला. फुलेवाडीकडून लेनिन याने २१व्या मिनिटास गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. हाच गोल अखेर निर्णायक ठरला. पूर्णवेळेत सुभाषनगरच्या इम्रान पठाण, आर्यन पंदारे, आदर्श व्ही.एम.,जावेद जमादार यांनी केलेल्या चढायांना यश मिळाले नाही. फुलेवाडीकडून उत्तम राय, शाम कुमार, शुभम देसाई, आदित्य तोरसकर यांनी गोलची आघाडी वाढवण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेर पूर्वार्धातील १-० गोलची आघाडी कायम राखत फुलेवाडीने विजय साकारला. ——————————————————-
      आजचे सामने…
• उत्तरेश्वर – रंकाळा : दुपारी १:३० वा.
• जुना बुधवार – सम्राटनगर : दु‌. ४ वाजता
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32 ° C
32 °
31.9 °
22 %
3.6kmh
16 %
Tue
32 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
26 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page