कोल्हापूर :
फायटर्स स्पोर्टस् क्लब आयोजित कै. प्रा. संजय देसाई स्मृतीचषक टी-२० क्रिकेट स्पर्धाला उत्साहात प्रारंभ झाला. रमेश कदम अकॅडमी आणि एम.जी. स्पोर्ट्स संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उदघाटन उद्योजक अविनाश चिकणीस व हॉस्पिटलचे ॲडमिनिस्ट्रेशन अधिकारी अजित पाटील यांच्या हस्ते डी. वाय. पाटील मैदानावर झाले. याप्रसंगी प्रा. डॉ. महादेव नरके, डॉ. राजेंद्र रायकर, चेतन पाटील, राजू पठाण, डॉ. संजय पाठारे, उमेश माने, अरुण सावंत, विनय पाटील, संजय कवडे व क्लबचे सर्व सदस्य व सहकारी उपस्थित होते.
कै. प्रा. संजय देसाई स्मृतीचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉ. डी.वाय. पाटील मैदानावर झालेला सकाळचा सामना रमेश कदम अकॅडमी विरुध्द फायटर्स स्पोर्ट्स क्लब (ब) यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना फायटर्स स्पोर्ट्स क्लब संघाने २० षटकात सर्वबाद ११६ धावा केल्या. त्यामध्ये पृथ्वेश जाधव ३५ ,आकाश राजपुरोहित १६ , सिद्धेश जाधव १३, पंचम मोरे १२ धावा केल्या. रमेश कदम अकॅडमीकडून गोलंदाजी करताना वसिम मुलाणी, क्षीतिज पाटील अणि मिहीर याने प्रत्येकी ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रमेश कदम अकॅडमीने २० षटकात ४ बाद ११९ धावा केल्या. त्यामधे प्रामुख्याने क्षीतिज पाटील ५१ धावा, वसीम मुलानी २६ धावा, आदित्य घाटगे नाबाद २४ धावा केल्या. फायटर्स स्पोर्ट्सडून गोलंदाजी करताना पंचम मोरे, कृष्णा पटेल, ओंकार सूर्यवंशी व आकाश राजपुरोहित यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. अशाप्रकारे रमेश कदम अकॅडमीने ६ गडी राखून विजय मिळवला.
दुसरा सामना भिडे स्पोर्ट्स विरुध्द एम. जी. स्पोर्ट्स यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना एम.जी.स्पोर्ट्स संघाने २० षटकात ७ बाद १६३ धावा केल्या. त्यामध्ये धीरेन सचदेव ६२ धावा, पुनित आहुजा ५२ धावा अणि अनिष आहुजा २२ धावा केल्या. भिडे स्पोर्ट्स संघाकडुन गोलंदाजी करताना राजु मुल्ला ३ बळी, धनराज सोनुले व सिमॉन काळे यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भिडे स्पोर्टस् संघाने १७.२ षटकात सर्वबाद १२० धावा केल्या. त्यामध्ये प्रथमेश बांदिवडेकर २९ धावा, सिमॉन काळे ३७ धावा केल्या. एम.जी. स्पोर्ट्स संघाकडुन गोलंदाजी करताना रवी खटवानी ३ बळी, आकाश व जितू पवनकुमार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. अशाप्रकारे एम. जी. स्पोर्ट्स संघाने ४३ धावांनी विजयी मिळवला.
——————————
रमेश कदम अकॅडमी आणि एम.जी. स्पोर्ट्सची विजयी सलामी
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
22 %
3.6kmh
16 %
Tue
32
°
Wed
28
°
Thu
27
°
Fri
26
°
Sat
26
°

