Homeकला - क्रीडाअस्मिता खेलो इंडिया वुशू स्पर्धेत कोल्हापूरचे यश

अस्मिता खेलो इंडिया वुशू स्पर्धेत कोल्हापूरचे यश

कोल्हापूर :
महिलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, विकास खेळातून घडावा तसेच त्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने शासनाच्या मान्यतेने महिलांसाठी अस्मिता खेलो इंडिया वुशू महिला लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावेळी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन यांच्यावतीने २१ डिसेंबर रोजी खडकपाड कल्याण येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग या स्पर्धेमध्ये वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या मुलींनी नेत्रदीप कामगिरी केली.
या स्पर्धा सब ज्युनियर, ज्युनियर, सिनीयर गटात सांडा (वजन गट )आणि तावलू (व्यक्तिगत प्रकारात) घेण्यात आल्या.
या स्पर्धेत सब ज्युनियर सांडा (वजन गट फाईट) सन्निधी लोहार- कास्यपदक, केंसिका कोडोलीकर-रौप्य पदक, वेदिका पाटील- कास्यपदक, सारा कांबळे सहभाग, निलजा लोहार सहभाग यांनी यश मिळवले. तसेच तावलू (व्यक्तिगत प्रकारात) श्रेयसी पाटील (नॉनकॉन) – कास्यपदक, हिरण्या चौगुले (नॉनकॉन) – कास्यपदक, सब स्वरा शिंदे   ताईचीक्वॉन, ताईजीजेन (रौप्यपदक), ज्युनियर सांडा (वजन गट फाईट)- पूर्वा पाटील- कास्यपदक, तनिष्का म्हामुलकर- कास्यपदक, तावलू या प्रकारात श्रुतिका यादव (चॅनकॉन) कास्यपदक यांनी यश संपादन केले.
सिनीयरमध्ये समृद्धी कुंभार (चॅनकॉन, क्वॉनशू ) रौप्य पदक, कस्तुरी केसरकर (नॉनकॉन, नांदाव) रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत सुमारे १८ जिल्ह्यातून ३३० खेळाडू मुलींचा सहभाग होता. या स्पर्धेत टीम मॅनेजर रोहित काशीद तर
टीम कोच विकास गवड, अतुल साळुंखे होते. या खेळाडूंना ऑल महाराष्ट्र वुशू संघटनेचे सचिव सोपान कटके आणि कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजगोंडा वळीवडे, सचिव सुभाष पासान्ना, उपाध्यक्ष सतीश वडणगेकर, यांचे प्रोत्साहन तसेच प्रमुख प्रशिक्षक अविनाश पाटील, संदीप पाटील स्तवन सोरटे यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32 ° C
32 °
31.9 °
22 %
3.6kmh
16 %
Tue
32 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
26 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page