Homeकला - क्रीडाकोल्हापूरात होणार नॅशनल व इंटरनॅशनल हॉकी सामने

कोल्हापूरात होणार नॅशनल व इंटरनॅशनल हॉकी सामने

• मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला सामन्यांसाठी FIH ची अधिकृत मान्यता
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला नॅशनल तसेच इंटरनॅशनल हॉकी सामने आयोजित करण्यासाठी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी (FIH) यांची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. ऑस्ट्रेलिया येथील फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असोसिएशनच्या निकषांनुसार आवश्यक असलेले पॉलिटॅन कंपनीचे अत्याधुनिक ॲस्ट्रोटर्फ मैदान महापालिकेच्यावतीने या स्टेडियममध्ये बसविण्यात आले आहे. या मान्यतेमुळे कोल्हापूर शहराच्या क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शहर सक्षम झाले आहे.
सदर ॲस्ट्रोटर्फ मैदानाची फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी (FIH) कडून १५ नोव्हेंबर २०२५ रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मानांकनाचे प्रमाणपत्र कोल्हापूर महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे. यामुळे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी सामने खेळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेअंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ॲस्ट्रोटर्फयुक्त मैदान व पूरक सुविधा विकसित करण्यासाठी रु. ५.५० कोटींच्या प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी मिळाली होती.
या प्रकल्पासाठी महापालिकेने १५व्या वित्त आयोगांतर्गत आपला हिस्सा म्हणून रु. १,४६,४५,०००/- इतका निधी उपलब्ध करून दिला. केंद्र शासन व महापालिकेच्या सहभागातून आजअखेर एकूण रु.६,९६,४५,०००/- इतका निधी या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
38 %
5.1kmh
20 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page