Homeशैक्षणिक - उद्योग कै. रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर

कै. रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर

कोल्हापूर :
राधानगरी येथील रेवताबाई एकावडे ट्रस्टच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा १०व्या वर्षी एकूण २० व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद दत्तात्रय एकावडे यांनी दिली.
ट्रस्टच्यावतीने सन २०२६ साठी डॉ. गणपत गवळी- राधानगरी (आरोग्यदूत), चंद्रशेखर कांबळे- राधानगरी (साहित्यरत्न), संगीता पाटील- राधानगरी (आदर्श शिक्षिका), संगीता पारकर- सो. शिरोली (आदर्श अंगणवाडी सेविका), अशोक पाटील- तारळे खुर्द (आदर्श शिक्षक), पंकज भोपळे- कंथेवाडी (आदर्श ट्रॅफिक पोलीस पुणे), प्रशांत राणे- पडळी (आदर्श शिक्षक), दिलीप कदम- कंथेवाडी (आदर्श ग्रामसेवक), प्राजक्ता पत्ताडे- बनाचीवाडी (आदर्श सरपंच), बळवंत डवर- कुडूत्री (आदर्श कर्मचारी वन विभाग), अश्विनी हुजरे- गुडाळवाडी (आदर्श आशा सुपरवायझर), प्रमिला भाटळे- सरवडे (आदर्श शिक्षिका), युवराज पोवार- खिंडी-व्हरवडे (आदर्श कृषीरत्न), रामचंद्र सावंत- राधानगरी (आदर्श कर्मचारी वन विभाग), सुभाष चौगुले- कुडूत्री (आदर्श पत्रकार), प्रकाश रासम- राई कंदलगाव (समाजरत्न), रेखा सावंत- राधानगरी (आदर्श शिक्षिका), जयवंत वंजारे- बनाचीवाडी (आदर्श लिपिक), पांडुरंग वंजारे- बनाचीवाडी (आदर्श पालक), धनाजी पाटील- पिरळ (आदर्श कर्मचारी महावितरण) असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
38 %
5.1kmh
20 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page