Homeसामाजिकजमीन क्षारपडमुक्ती कामास प्रशासकीय पातळीवर लागणारी मदत देण्यास कटिबद्ध

जमीन क्षारपडमुक्ती कामास प्रशासकीय पातळीवर लागणारी मदत देण्यास कटिबद्ध

• निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची ग्वाही
कोल्हापूर :
उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले जमीन क्षारपडमुक्तीचे काम हे कौतुकास्पद आहे. या कामामुळे शिरोळमधील क्षारपड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्नचे नाव देशपातळीवर गेले आहे. शेतकऱ्यांनी आपली पाणस्थळ अथवा क्षारपड जमीन सुधारणेसाठी दत्त पॅटर्नचा वापर करावा. या कामांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय पातळीवर लागणारी सर्व मदत देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
क्षारपड मुक्तीचे जनक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हसूर येथील ८० एकर व कनवाड येथील २५० एकर जमीन क्षारपड सुधारणा सर्व्हे कामाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतात तत्कालीन तहसीलदार गजानन गुरव, भूमी अभिलेखच्या सौ. सुवर्णा मसणे, सहायक निबंधक प्रदीप मालगावे, महसूल खात्याचे अधिकारी यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून क्षारपड मुक्तीच्या कामाला मोठे सहकार्य मिळाल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना या कामांमध्ये लागणारी सर्व ती मदत करून कामाच्या पूर्ततेसाठी शेवटपर्यंत पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. शेतीतज्ञ शांतीकुमार पाटील यांनी क्षारपडमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.
हसूर येथे झालेल्या कार्यक्रमात धनपाल शेडबाळे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी श्री दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, शेखर पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, इंजिनियर कीर्तीवर्धन मरजे, सरपंच सौ. आकाशी कांबळे, उपसरपंच अभिजीत पाटील, कलगोंडा पाटील, सागर पाटील, अजित चौगुले, प्रकाश केरीमने, रमेश चौगुले, प्रदीप पाटील यांच्यासह श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थेचे सर्व संचालक, सहभागी शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, कनवाड येथे मान्यवरांच्या हस्ते सर्व्हे कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी चाँद इनामदार यांनी स्वागत केले. दिलीप माणगावे, दस्तगीर इनामदार यांनी शेतकऱ्यांना या कामात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. सरपंच इरफान बुरान, उपसरपंच राजू कुपाडे, दादासो खटावणे, मुसा इनामदार, संतोष गौराज, सातगोंडा गौराज, रामगोंडा कुपाडे, अरविंद गौराज, राहुल गौराज, इब्राहिम दर्गावाले, महावीर नरगच्चे, सुरेश उपाडे शिंदे सुनील जाधव सुनील शिंदे अख्तर पटेल यांच्यासह सहभागी शेतकरी

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
21.9 °
46 %
3.6kmh
3 %
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page