कोल्हापूर :
निर्धारित वेळेतील तीन मिनिटे शिल्लक असताना दिलबहारच्या गोलक्षेत्रात सुशांत अतिग्रे याचा हॅण्डबॉल झाला. यावर मिळालेल्या पेनल्टी किकवर संकेत अनिल साळोखेने अचूक गोल नोंदवला. हा गोलच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. या एकमेव गोलच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळने दिलबहार तालीम मंडळवर मात केली. या सलग दुसऱ्या विजयासह ‘शिवाजी’ने एकूण सहा गुणावर झेप घेतली आहे. गुरुवारी सामन्याला सुट्टी आहे. शुक्रवारी (दि.१९) शिवाजी तरुण मंडळ विरूध्द सम्राटनगर स्पोर्ट्स हा सामना होईल.
दरम्यान, मंगळवारी वेताळमाळ तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामन्यात जादावेळेत ‘वेताळमाळ’च्या ऋतुराज सुर्यवंशीचा स्वयंगोल झाला. या स्वयंगोलमुळे ‘शिवाजी’ला तारले. तर आज, दिलबहार विरूध्दच्या सामन्यात ७७व्या मिनिटाला हॅण्डबॉल झाल्याने पेनल्टी मिळाली अन् त्यावर संकेत अनिल साळोखेने गोल नोंदवला. अशाप्रकारे शेवटच्या काही वेळेतच शिवाजी तरुण मंडळ विजय मिळवण्यात यशस्वी ठरले.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारी शिवाजी तरुण मंडळ विरूध्द दिलबहार तालीम मंडळ या सामन्यात पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. दोन्ही संघाकडून वेगवान खेळ व आक्रमक चढाया झाल्या पण गोल झाला नाही.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. ‘दिलबहार’कडून गंधर्व घाटगे तर ‘शिवाजी’कडून यश जांभळे यांनी गोलच्या सोप्या संधी वाया घालवल्या. दिलबहारच्या प्रथम भोसले, स्वयंम साळोखे, सार्थक मगदूम, माणिक पाटील, फेबिन गिब्स यांनी केलेल्या चढाया फिनिशिंगअभावी वाया गेल्या. ‘शिवाजी’कडून खुर्शिद अली, संकेत नितीन साळोखे, रोहन आडनाईक, संकेत अनिल साळोखे, हर्ष जरग, सिध्देश साळोखे यांनी गोलक्षेत्रात खोलवर चाली रचल्या पण समन्वयाचा अभाव आणि दिशाहीन फटके यामुळे गोलची नोंद झाली नाही. दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथेने उत्कृष्ट गोलरक्षण करून काही चढाया फोल ठरविल्या. सामना बरोबरीत सुटेल अशी शक्यता असताना ‘शिवाजी’कडून झालेल्या एका चढाईत दिलबहारच्या गोलक्षेत्रात सुशांत अतिग्रे याचा हॅण्डबॉल झाला. त्यामुळे मुख्यपंच अभिजीत गायकवाड यांनी पेनल्टी किक दिली. यावर संकेत अनिल साळोखेने अचूक फटक्याद्वारे गोल नोंदवून ७७व्या मिनिटाला संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. हाच गोल सामन्याचा निकाली ठरला. उर्वरित वेळेत १-०ची आघाडी राखून ‘शिवाजी’ने सलग दुसरा विजय प्राप्त केला.
——————————
शिवाजी’चा सलग दुसरा विजय
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
28.9
°
42 %
3.6kmh
3 %
Thu
30
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
27
°
Mon
28
°

