Homeकला - क्रीडास्वयंगोलमुळे 'शिवाजी'ची 'वेताळमाळ'वर मात

स्वयंगोलमुळे ‘शिवाजी’ची ‘वेताळमाळ’वर मात

कोल्हापूर :
जादावेळेत झालेल्या स्वयंगोलमुळे शिवाजी तरुण मंडळने वेताळमाळ तालीम मंडळवर १-० गोलने मात केली. या विजयासह ‘शिवाजी’ने पहिल्याच सामन्यात तीन गुण प्राप्त करून संघाचे खाते उघडले. बुधवारी (दि.१७) दुपारी ४ वाजता शिवाजी तरुण मंडळ विरूध्द दिलबहार तालीम मंडळ हा सामना होईल.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारी शिवाजी तरुण मंडळ विरूध्द वेताळमाळ तालीम मंडळ या तुल्यबळ संघातील सामन्यात पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. दोन्ही संघाकडून वेगवान खेळ व आक्रमक चढाया झाल्या पण ४० मिनिटात गोलची नोंद झाली नाही.      वेगवान चाली, परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या खोलवर चढाया, पण गोलमध्ये रुपांतर करण्यात आलेले अपयश यामुळे सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार चढाया केल्या. ‘शिवाजी’कडून यश जांभळे, संकेत साळोखे, खुर्शीद अली, इंद्रजीत चौगुले यांच्या चढाया वाया गेल्या. दर्शन पाटीलने दिलेल्या पासवर संकेत साळोखेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची सोपी संधी वाया गेली. वेताळमाळच्या सर्वेश वाडकर, आकाश माळी, शोएब बागवान, मिताई, आकाश मोरे, राहुल पाटील यांनी खोलवर चाली रचल्या पण ते गोल करण्यात अपयशी ठरले.  त्यांच्या जय कामत याला नियमबाह्य खेळाबद्दल दोनदा येलो कार्ड झाल्याने मुख्यपंच अजिंक्य गुजर जयला रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर घालवले. वेताळमाळचे १० खेळाडू मैदानात खेळ राहिले. ‘शिवाजी’कडून जादावेळेत झालेल्या एका चढाईत मारलेल्या चेंडूला रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऋतुराज सुर्यवंशीने चेंडूला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट गोलजाळ्यात शिरला. अशाप्रकारे ‘शिवाजी’ला ८४व्या मिनिटाला आपसूकच आघाडी मिळाली. याच स्वयंगोलच्या रुपाने मिळालेल्या १-०च्या आघाडीवर ‘शिवाजी’ने विजय संपादन करून तीन गुणांची कमाई केली.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
41 %
2.1kmh
20 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
26 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page