Homeकला - क्रीडारंकाळा तालीमकडून फुलेवाडी पराभूत 

रंकाळा तालीमकडून फुलेवाडी पराभूत 

कोल्हापूर :
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात रंकाळा तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळचा २ विरूध्द १ गोलने पराभव केला. तिसऱ्या फेरीअखेर दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला फुलेवाडीला स्वयंगोलमुळे आघाडी मिळाली. शिवतेज पाटीलचा हा स्वयंगोल झाला. गोलची पिछाडी भरून काढण्यासाठी रंकाळा तालीमकडून उत्तम राय, हर्षल चौगले, शाम कुमार सिध्दार्थ पाटील यांनी खोलवर चाली केल्या पण त्यांना यश आले नाही.
उत्तरार्धात ५७व्या मिनिटाला पी.सी. कृष्णाज याने गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत आणला. फुलेवाडीच्या उत्तम राय, शाम कुमार, सिध्दार्थ पाटील, हर्षल चौगले यांनी आघाडी मिळवण्यासाठी केलेल्या चढाया दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. रंकाळा तालीमकडून जोरदार चढाया झाल्या. त्यांच्या इतिफाक आझाद, सोहम निकम, सौरभ मोहिते, मेहराज उदीन, प्रतिक पाटील यांनी केलेल्या चढाया समन्वाचा अभाव आणि फिनिशिंगअभावी वाया गेल्या. अखेर जादावेळेत इतिफाक आझादने गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. इतिफाक आझादने फ्रीकिकवर नोंदवलेल्या या गोलमुळे रंकाळा तालीमने २-१ ची आघाडी घेऊन सामना जिंकला.
——————————————————-
आजचे सामने…
• उत्तरेश्वर – सुभाषनगर : दु. १:३० वाजता
• जुना बुधवार – बालगोपाल : दु. ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
47 %
2.6kmh
0 %
Sat
26 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page