• आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रतिनिधींची गोकुळला भेट
कोल्हापूर :
गोकुळवर दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच संघाची खरी ताकद आहे. हा विश्वास कायम टिकवण्यासाठी गोकुळने सातत्याने शेतकरीहित काम करावे, असे प्रतिपादन इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड (इडीफ) भारताचे मुख्य सल्लागार डॉ. अभिनव गौरव यांनी केले. यावेळी त्यांनी गोकुळमध्ये राबवलेल्या प्रकल्पाचे कौतुक करत, दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेत गोकुळला प्रेझेंटेशनसाठी आमंत्रित केले आहे, ज्यामध्ये गोकुळच्या यशस्वी योजनांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरण होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका (इडीफ) व भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन (बायफ) उरळीकांचन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टी.एम.आर. उत्पादनाचा वापर वाढविणे तसेच म्हैस पालनाची सुधारित पद्धत शोधून काढणे व जनावराची प्रजनन क्षमता सुधारणे यासाठी हा संशोधन प्रकल्प राबविला होता. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी इडीफ व बायफ यांचे प्रतिनिधी यांनी गोकुळ दूध संघास भेट दिली असता गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड (इडीफ) उपाध्यक्ष अँड्र्यू हटसन म्हणाले की, गोकुळ दूध संघाचे दूध उत्पादकांप्रती असलेले कामकाज अतिशय प्रभावी, पारदर्शक व समाधानकारक आहे. त्यांनी पुढे सांगितले की आगामी काळात म्हैस दुधाला मोठ्या प्रमाणात जागतिक मागणी वाढणार असून म्हैस दुधास दुग्धव्यवसायामध्ये चांगले भविष्य आहे. गोकुळ दूध संघाने जनावरांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, आरोग्य सुधारणा व उन्नतीसाठी आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून संशोधनाला चालना देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी अरुण डोंगळे म्हणाले की, दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांचे प्रजनन क्षमता व वंध्यत्व निवारण हे महत्वाचे असून बायफ व इडीफ यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यात असे वेगवेगळे उपक्रम गोकुळ संघामध्ये राबवावेत.
बायफचे प्रतिनिधी सचिन जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रतिनिधींनी पुनाळ, यवलुज, कोपार्डे, सडोली खालसा, बाचणी या गावातील निवडक प्राथमिक दूध संस्थेमधील संकलन प्रक्रिया, जनावराची पाहणी, दूध उत्पादक मिटिंग, वैरण बँक शिंदेवाडी व महालक्ष्मी टी. एम.आर.प्लांट भेट दिली. त्यानंतर गोकुळच्या मुख्य प्रकल्पातील उत्पादन, गुणवत्ता तपासणी व वितरण प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला तसेच खासकरून पशुसंवर्धन विभागाची सविस्तर माहिती घेतली. संघाचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी गोकुळच्या विविध योजनांबाबत तसेच शेतकरी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी यावेळी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिकेचे अँड्र्यू हटसन, जॉन टॉझेल, ॲलिसन ईगल, डेरेक टेपे, बायफचे मुख्य सल्लागार डॉ. अभिनव गौरव, डॉ. सचिन जोशी, डॉ. किशोर नवले, उदय वड्डी, वरुण गांधी, अक्षय जोशी, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, डॉ. दयावर्धन कामत, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ. व्ही. डी. पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————
दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद : डॉ.अभिनव गौरव
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
26
°
47 %
2.6kmh
0 %
Sat
26
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
28
°

