• ॲथलेटिक्स, कयाकिंगमध्ये नेत्रदीपक कामगिरी
कोल्हापूर :
जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या ५व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी ४ सुवर्णपदकांसह एकूण २० पदके प्राप्त केली. यामध्ये तीन रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. कयाकिंगमध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ॲथलेटिक्समध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. १०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून ऋषी प्रसाद देसाई याने दमदार सुरवात केली, तर प्राची देवकाते हिने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक मिळवून स्पर्धेची अखेरही सुवर्णमयी केली. ॲथलेटिक्समध्ये ११० मीटर अडथळा शर्यतीत विकास आनंदा खोडके याने १४.५१ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक प्राप्त केले. तर, ८०० मीटर धावण्यात रिया पाटीलने कांस्यपदक प्राप्त केले.
कयाकिंग व कनोईंग प्रकारात विद्यापीठाच्या खेळाडूंनी पाच कांस्यपदके मिळविली. कनोईंगमध्ये वैयक्तिक गटात १००० मीटर सी-वन प्रकारात प्रिया मारुती चव्हाण हिने कांस्यपदक पटकावले.
कयाकिंगमध्ये विद्यापीठाच्या चमूने ४ कांस्यपदके पटकावली. कयाकिंग के-फोर १००० मीटर महिला संघाने कांस्यपदक पटकावले. या संघात आरती जाधव, निकिता मगदूम, सुहाना जमादार आणि प्रणाली कोपर्डे होत्या. याच संघाने के-फोर २०० मीटर महिला गटातही कांस्यपदक मिळवले. के-फोर ५०० मीटर महिला गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या विद्यापीठाच्या संघात ऋतुजा पाटील, आरती जाधव, निकिता मगदूम व सुहाना जमादार होत्या. के-फोर २०० मीटर पुरुष गटात कांस्यपदक मिळवून देणाऱ्या संघात करण घुणके, स्वानंद अक्कीवाटे, अमेय भुयेकर आणि श्रीसमर्थ सासणे होते.
खेलो इंडियामध्ये शिवाजी विद्यापीठाला ४ सुवर्णांसह २० पदके
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
25
°
50 %
2.1kmh
0 %
Mon
26
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°

