Homeकला - क्रीडापोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर :
पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूरतर्फे वार्षिक क्रीडा दिन “Sports for Peace” हा उत्साह, शिस्त आणि एकतेच्या वातावरणात कोल्हापूर पोलिस ग्राउंड येथे भव्यदिव्य पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पितळी गणपती मंदिरात मशाल प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर शाळेतील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंनी मशाल हातात घेऊन पोलिस क्रीडांगणावर प्रवेश केला. प्रवेशद्वारावर लेझीम पथकाने दिलेल्या स्वागतानंतर मशाल प्रज्वलन, ध्वजारोहण आणि शपथविधी पार पडले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड, माजी पोलीस उपनिरीक्षक व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू शरद माळी उपस्थित होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आदेश रुकडीकर यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
याप्रसंगी चारही हाऊसेसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मार्च पस्तमध्ये शिस्त, संघभावना आणि क्रीडाभाव यांचे उत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी योगा, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, एरोबिक्स, फॅन ड्रिल, स्मायली ड्रिल, लेझीम तसेच विविध सांघिक व विषयाधारित ड्रिल्समधून उत्कृष्ट कौशल्य सादर केले.
५० मी., १०० मी., २०० मी., ४०० मी. धावण्याच्या शर्यती, तसेच रिले स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट हाऊस पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्राचार्या सौ. शिल्पा कपूर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे विशेष कौतुक करताना सांगितले की, क्रीडा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास व ऐक्याची भावना दृढ करते आणि ‘Sports for Peace’ च्या माध्यमातून शांतता व सौहार्दाचा संदेश पोहोचवते.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
24 ° C
24 °
24 °
69 %
3.6kmh
0 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
26 °

Most Popular

You cannot copy content of this page