कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशन (केएसए)चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार कोल्हापूरात प्रथमच फुटबॉल मॅच कमिशनर तयार होण्यासाठी दोन दिवसांचे वर्कशॉप दि. १५ व १६ डिसेंबर रोजी छत्रपती शाहू स्टेडियम येथे घेण्यात येणार आहे.
फुटबॉल सामने नियमानुसार व शांततेत पार पडणेसाठी सामन्यांवर संपूर्णपणे नियंत्रण असणे आवश्यक आहे. याकरिता मॅच कमिशनर यांची भूमिका अत्यंत महत्त्त्वाची आहे. ही भूमिका लक्षात घेऊनच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुढीलप्रमाणे पात्रता व अटी आहेत. वय ३० ते ६० या दरम्यान असावे. फुटबॉल खेळाचा उत्तम अनुभव व माहिती असली पाहिजे. संगणक कामकाजामध्ये कुशलता पाहिजे. इंग्लिश भाषेमध्ये लिहिता व बोलता आले पाहिजे.
वरीलप्रमाणे पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या इच्छूकांनी दि. १२ डिसेंबर २०२५ पर्यंत केएसए कार्यालयात नांव नोंदणी करावी, असे केएसएचे ऑन.जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
——————————
केएसएच्यावतीने कोल्हापूरात प्रथमच वर्कशॉप फॉर फुटबॉल मॅच कमिशनर
RELATED ARTICLES
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
3.6kmh
0 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
26
°

