Homeराजकियएकत्रित लढू; महायुतीतील सर्व पक्षांचा व कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवू

एकत्रित लढू; महायुतीतील सर्व पक्षांचा व कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवू

• मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात बैठक
कोल्हापूर :
महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढू. तसेच महायुतीमधील सर्व पक्षांचा व कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवू, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कार्यकर्त्यांचा मान – सन्मान ठेवून कार्यकर्त्यांना संधी देवू. महायुतीतील सर्वच पक्षाचा मान सन्मान ठेवू. जिल्ह्यातील १० पैकी १० विधानसभा सदस्य मतदारांनी निवडून देत महायुतीला कौल दिला आहे. या मतदारांनी महायुती म्हणून दिलेल्या मतांचा अनादर कोणताही महायुतीतील पक्षाकडून होणार नाही याची काळजी घेवूया. महायुती म्हणून एकत्रित लढूया, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32 ° C
32 °
30.9 °
37 %
8.2kmh
3 %
Sat
32 °
Sun
29 °
Mon
31 °
Tue
30 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page