कोल्हापूर :
पूर्वार्धात नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळने पाटाकडील तालीम मंडळ (ब)वर विजय मिळवला. फुलेवाडीने सलग दुसऱ्या विजयासह ६ गुण मिळविले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांनी प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर २-०ने विजय प्राप्त केला होता. पाटाकडील (ब)चा हा सलग दुसरा पराभव झाल्याने अद्याप त्यांना गुणांचे खाते उघडता आलेले नसल्याने शून्य गुण आहेत.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. रविवारी दुपारी सिनियर -८ गटातील फुलेवाडी आणि प्रॅक्टीस क्लब संघादरम्यान सामना झाला. फुलेवाडीच्या हर्षल चौगलेने १२व्या मिनिटास मैदानी गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर चढायांमधील सातत्य कायम राखत त्यांनी दुसऱ्या गोलची आघाडी घेतली. उत्तम रायने दिलेल्या पासवर श्याम कुमारने ३८व्या मिनिटाला गोल केला. पाटाकडील (ब)च्या यश मुळीक, युनूस पठाण, ओमकार देवणे, सार्थक राऊत, मुहम्मद इस्कान यांनी गोलची परतफेड करण्यासाठी खोलवर चढाया केल्या पण समन्वयाचा अभाव असल्याने त्यांना यश आले नाही.
उत्तरार्धात गोलची आघाडी वाढवण्यासाठी फुलेवाडीच्या उत्तम राय, श्याम कुमार, हर्षल चौगले, सिध्दार्थ पाटील, दिग्विजय सुतार यांनी केलेल्या चढाया दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. पाटाकडील (ब) कडून मुहम्मद इस्कान, सार्थक राऊत, यश मुळीक, ओमकार देवणे यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना गोलची आघाडी वाढवण्यात यश आले नाही. मुहम्मद इस्कान व ओमकार देवणे यांना गोलची सोपी संधी मिळूनही अपयशी ठरले. अखेर पूर्वार्धातील २-० गोलची आघाडी कायम राखून फुलेवाडीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
——————————
• उत्तरेश्वर – प्रॅक्टीस क्लब : दु. १:३० वा.
• जुना बुधवार – वेताळमाळ : दु. ४ वाजता
फुलेवाडीचा सलग दुसरा विजय
RELATED ARTICLES
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
3.6kmh
0 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
26
°

