कोल्हापूर :
चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने बालगोपाल तालीम मंडळवर ४-२ गोलने विजय मिळवला. तसेच सुभाषनगर फुटबॉल क्लबने झुंजार क्लबवर ३-१ गोलने मात केली. या विजयासह खंडोबा आणि सुभाषनगर संघाने प्रत्येकी ३ गुणांची कमाई केली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत मंगळवारी खंडोबा आणि बालगोपाल यांच्यातील सामना चुरशीचा झाला. खंडोबाकडून शाहीर एस. ने केलेल्या जोरदार चढाईत त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टला धडकला आणि त्या चेंडूला कुणाल दळवीने गोलजाळ्यात मारून संघाला आघाडी मिळवून दिली. एका गोलच्या पिछाडीवर आलेल्या बालगोपालने सावध खेळी करत खोलवर चाली केल्या. त्यामध्ये प्रतिक पोवारने गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत आणला. २०व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर २४व्या मिनिटाला सुजित आर.च्या पासवर अभिनव साळोखेने गोल करून संघाला २-१ ने आघाडीवर नेले.
उत्तरार्धात खंडोबाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. त्यामध्ये कुणाल देवीने वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल करून सामन्यात २-२ बरोबरी साधली. ४४व्या मिनिटानंतर ५८व्या मिनिटाला रोहित जाधवने गोल नोंदवून संघाला ३-२ची आघाडी मिळवून दिली. अखेर ६९व्या मिनिटाला विष्णू टी.एम.ने मिळालेल्या संधीचा लाभ उठवत संघाचा चौथा गोल केला. उर्वरित वेळेत बालगोपालच्या ऋतुराज पाटील, देवराज मंडलिक, सुजित आर. यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर खंडोबाने ४-२ ने विजयावर शिक्कामोर्तब करून तीन गुणांची कमाई केली.
सुभाषनगर विजयी…
दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात सुभाषनगर फुटबॉल क्लबने झुंजार क्लबला पराभवाचा धक्का दिला. चुरशीने झालेल्या या सामन्यात समर्थ चिंतेने १२व्या मिनिटाला सुभाषनगरचा पहिला गोल केला. त्यानंतर सुधीर कोटिकोलाने १५व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी २-० अशी वाढवली.
पूर्वार्धात मिळालेल्या आघाडीच्या जोरावर उत्तरार्धात आणखी एका गोलची आघाडी घेतली. सुधीर कोटिकोलाने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल ४९व्या मिनिटाला करून आघाडी भक्कम केली. गोलची परतफेड करण्यासाठी झुंझार क्लबच्या खेळाडूंनी केलेल्या चढाया दिशाहीन फटके व समन्वयाअभावी वाया गेल्या. त्यांच्या शुभम मोजे, समर्थ नवाळे, शुभम पाटील यांना गोल करण्यात अपयश आले. एका चढाईत सुभाषनगरच्या गोलक्षेत्रात हॅण्डबॉल झाल्याने झुंजार क्लबला पेनल्टी मिळाली, पण शाहू भोईटेने ही मिळालेली सोपी संधी वाया घालवली. त्यानंतर ८१व्या मिनिटाला शाहू भोईटेने उत्कृष्ट गोल नोंदवून आघाडी कमी केली. अखेर उर्वरित वेळेत सुभाषनगरने ३-१ गोलची आघाडी कायम राखून विजयासह तीन गुण प्राप्त केले.
——————————————————-
आजचा सामना…
• फुलेवाडी – प्रॅक्टीस क्लब : दु. १:३० वा.
——————————————————-
• फोटो : नाझ अत्तार, कोल्हापूर.
——————————————————-
खंडोबा आणि सुभाषनगर विजयी
RELATED ARTICLES
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
61 %
0kmh
0 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

