Homeकला - क्रीडासंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सरनोबत चषक पटकाविला

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सरनोबत चषक पटकाविला

कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल आणि छत्रपती शाहू विद्यालय यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात संजय घोडावत स्कूल संघाने ९ गडी राखून विजय मिळवत सरनोबत स्मृती चषक पटकाविला. स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज म्हणून संस्कार पाटील (सेंट झेवियर्स हायस्कूल), उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून तंक्ष शांभवणी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) तर मालिकावीर म्हणून प्रसाद नाईक (छत्रपती शाहू विद्यालय) यांना गौरविण्यात आले.
कोल्हापूर स्पोर्ट्‌‍स असोसिएशन आयोजित सरनोबत परिवार पुरस्कृत तात्यासाहेब सरनोबत स्मृतीचषक आंतर शालेय १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा शाहुपूरी जिमखाना येथे संपन्न झाली. स्पर्धेचे हे २२वे वर्ष आहे. स्पर्धेत एकूण ९ संघ सहभागी झाले होते. या संघांमध्ये बाद पद्धतीने ८ सामने चुरशीचे झाले. अंतिम सामना छत्रपती शाहू विद्यालय आणि संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांच्यात झाला. हा सामना संजय घोडावत स्कूल संघाने ९ गडी राखून जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना छत्रपती शाहू विद्यालय संघाच्या २४.१ षटकांत सर्वबाद ९५ धावा झाल्या. यामध्ये वीर खतवाणी १७, अर्णव जोशी १५, मन्न ओसवाल ११, प्रसाद नाईक ८, मनन ओसवाल ८ धावा केल्या. गोलंदाजी करताना संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल संघाच्या तंक्ष शांभवणीने ७ धावात ३ बळी, साईराज पानसरे व रोहित इदाते यांनी प्रत्येकी २ बळी तर विहान लद्दा, लोक पाटील व विजय कलाल यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. अवांतर धावा १९ दिल्या.
उत्तरादाखल खेळताना संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल संघाने १६ षटकांत २ गडी गमावून ९९ धावा करून ९ गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केले. यामध्ये पंकज गोदेजा ३५, क्षितिज जाधव १६, राजवीर जेवराणी १६ व विजय कलाल १३ धावा केल्या. गोलंदाजी करताना छत्रपती शाहू विद्यालयच्या अर्णव जोशी व मनन ओसवाल यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. अवांतर धावा १९ दिला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी रणजीपटू संग्राम अतितकर व केडीसीएचे सेक्रेटरी मदन शेळके यांच्या हस्ते झाला. यावेळी केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन.फायनान्स व क्रिकेट सेक्रेटरी नंदकुमार बामणे, विश्वंभर मालेकर, माजी रणजीपटू रमेश हजारे व क्रिकेटपटू रहिम खान व क्रिकेट पंच उपस्थित होते.
नंदकुमार बामणे यांनी उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. स्पर्धेतील विजेता संघास कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात आला. तसेच उपविजेता संघास कायमस्वरूपी चषक देण्यात आला.
विजेता संघ असा- विजय कलाल, विहान लद्दा, पंकज गोदेजा, लोक पाटील, तंक्ष शांभवणी, रोनित इदाते, क्षितिज जाधव, तेजस शालगर, साईराज पानसरे, सिद्धांत पाटील, राजवीर जेवराणी, राजवीर गाडे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
25.9 °
36 %
4.6kmh
20 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page