• पॉण्डेचरी येथील परिषदेत आयएसटीईकडून गौरव
कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्लीतर्फे (आयएसटीई) राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्या हस्ते डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठचे कुलसचिव प्रा. डॉ. जयेन्द्र खोत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पॉण्डेचरीमधील मनकुला विनयागर अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शनिवारी आयएसटीईची ५५वी राष्ट्रीय परिषद झाली. यावेळी आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, पॉण्डेचरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश बाबू, तक्षशिला विद्यापीठाचे कुलपती आणि मनकुला विनायगर एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष एम. धनसेकरन, आयएसटीई राष्ट्रीय कार्यकारी परिषद संचालक प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्यासह सर्व संचालक व देशभरातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कॅम्पसचा सर्वांगीण विकास, पर्यावरणपूरक उपक्रम, हरित उपयोजनांचा सातत्यपूर्ण अवलंब आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तम वातावरण निर्माण करण्याच्या कामगिरीची दखल घेऊन विद्यापीठाचा यावेळी ‘बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ने सन्मान करण्यात आला.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून एकेकाळी ओसाड माळरान असलेला २०५ एकरचा हा परिसर आज ऑक्सीजन झोन बनला आहे. विद्यार्थ्याना कृषि क्षेत्रातील विविध प्रयोग करण्यासाठी या ठिकाणी स्वच्छ व पूरक वातावरण उपलब्ध आहे. डॉ. संजय डी. पाटील यांनी तळसंदे कॅम्पसच्या विकासासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची विशेष प्रशंसा करण्यात आली.
विद्यापीठाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. अनिल कुमार गुप्ता यांनी विद्यापीठातील सर्व सहकारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस पुरस्कार
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
25.9
°
36 %
4.6kmh
20 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

