• विविध नामांकित कंपन्यांसह, पशुपक्षी, जातिवंत जनावरे यांचा सहभग
कोल्हापूर :
शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे ‘सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२५’ येत्या ५ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत तपोवन मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याच बरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन,तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान,नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संयोजक विनोद पाटील, सुनील काटकर, धीरज पाटील, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे जयवंत जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे, विभागीय संशोधन संचालक डॉ. सुनिल कराड, नामदेवराव परीट, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, डॉ. प्रमोद बाबर, गोकुळचे हणमंत पाटील, डॉ. साळुंखे, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, डी. डी. पाटील, प्रा. महादेव नरके,स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत उपस्थित होते.
प्रदर्शनाचे उदघाटन ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी,आमदार सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तरी चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असे संयोजक यांनी आवाहन केले आहे.
प्रदर्शनाचे हे ७ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, १५० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात आल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.
प्रदर्शनात नामवंत कंपन्या आपले उत्पादन सोबत सहभागी होत आहेत. तसेच विविध बी-बियाणे शेतीची अवजारे, खते औषधे आदी उत्पादने पहावयास मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळणार आहेत. प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, जनावरे स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशुस्पर्धांची बक्षीसही दिले जाणार आहेत. याहीवर्षी तांदूळ महोत्सव भरविण्यात आला असून यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी तांदूळ, हळद, नाचणी शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध केले आहेत, त्याची विक्री होणार आहे. तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए. आय. तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय. किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होणार आहे. प्रदर्शनामध्ये काळा आणि लाल पेरू, काळा ऊस पाहावयास मिळणार आहे. तीन दिवस शेतीविषयक तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
——————————————————-
सतेज कृषी प्रदर्शन ५ डिसेंबरपासून
RELATED ARTICLES
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
65 %
2.6kmh
0 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
26
°

