कोल्हापूर :
राष्ट्रीय दुग्ध दिन आणि श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आज अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे व शिक्षणतज्ञ डॉ. सोनिया राजपूत यांच्या हस्ते डॉ. कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. कुरियन यांनी देशाच्या दुग्ध क्रांतीत दिलेले योगदान आणि ऑपरेशन फ्लड योजनेद्वारे भारताला दुग्ध उत्पादनात अग्रस्थानी नेण्यामागील त्यांची दूरदृष्टी याचे स्मरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळच्या उभारणीत व जडणघडणीत डॉ. कुरियन यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. २०१४ पासून देशात राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा होत आहे. सहकारावर आधारित संस्थांना बळ देण्याचा त्यांनी दिलेला संदेश आजही गोकुळच्या कार्यपद्धतीचा पाया आहे. त्यांच्या विचारांमुळेच गोकुळची आर्थिक स्थिती नेहमी भक्कम राहिली.
यावेळी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. प्रकाश साळुंके, व्यवस्थापक संकलन शरद तुरबेकर, दत्तात्रय वागरे, धनाजी पाटील, कृष्णात आमते, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. दयावर्धन कामत, बाजीराव मुडकशिवाले, महिला नेतृत्व विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-
गोकुळमध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
65 %
1.5kmh
0 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°

