कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठात बुधवारी (दि.२६) संविधान दिन आणि शहीद दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेस अभिवादन करण्यात येऊन प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. प्रल्हाद माने यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले शूर पोलीस अधिकारी आणि जवान यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, आजीवन अध्ययन केंद्राचे डॉ. रामचंद्र पवार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. प्रकाश बिलावर, डॉ. प्रमोद पांडव, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात संविधान दिन व शहीद दिन साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
65 %
1.5kmh
0 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°

