कोल्हापूर :
सामाजिक कार्यकर्ते, नेते व उद्योजक
विकास पासलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्यावतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि.२६) राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होईल.
विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्यावतीने आयोजित विकास पासलकर यांचा सत्कार हिंदुराव हुजरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पैलवान बाबा महाडिक हे आहेत. याप्रसंगी छावा संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू सावंत, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील, हुजरे-पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सुरेश हुजरे-पाटील, क्रीडाई संचालक सुनील चिले, संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव खोत व निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक असलेल्या विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी केले आहे.
——————————————————-
विकास पासलकर यांचा आज सत्कार
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
65 %
2.6kmh
0 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
26
°

