कोल्हापूर :
स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त
डॉ. मिलिंद बोकील यांचे शनिवारी (दि.२२) व्याख्यान आयोजित केले आहे. दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, महिला दक्षता समिती, निसर्गमित्र परिवार, जनस्वास्थ दक्षता समिती व पाटगावकर परिवार याच्या सयुक्त विद्यामाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘लोकशाहीतून स्वराज्याकडे’ या विषयावर डॉ. मिलींद बोकिल मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन मिनी हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे.
प्रा. पाटगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विविध समाज आणि त्यांच्या व्यवस्थेचा सखोल अभ्यास असलेले समाजशास्त्रज्ञ, प्रसिद्ध लेखक डॉ. मिलिंद बोकिल लोकशाहीबाबत विवेचन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले असणार आहेत. तसेच सुरेश शिपूरकर यांचीही प्रमुख उपस्थिती आहे.
——————————————————-
प्रा. पाटगावकर स्मृतिदिनानिमित्त शनिवारी डॉ. मिलिंद बोकील यांचे व्याख्यान
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
64 %
2.1kmh
7 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

