Homeसामाजिकसैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रम

सैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रम

कोल्हापूर :
कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आगामी सैन्य भरती मोहिमेत देशभरातून सहभाग घेणाऱ्या युवकांसाठी व्हाईट आर्मीतर्फे आयोजित मोफत अन्नछत्राचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय संजय घोडावत फाउंडेशनने जाहीर केला आहे. देशसेवेसाठी धडपडणाऱ्या तरुणांना अन्नासारख्या मूलभूत गरजा विनामूल्य उपलब्ध करून देणे ही सामाजिक बांधिलकीच असल्याचे फाउंडेशनने सांगितले.भरतीसाठी येणाऱ्या २० हजार पेक्षा जास्त सहभागी उमेदवारांना याचा लाभ होणार आहे.
संजय घोडावत विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात चेअरमन संजय घोडावत यांनी व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांना अन्नछत्रासाठीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, संचालक डॉ. विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजय घोडावत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले की, देशाचे रक्षण करणाऱ्या भावी जवानांसाठी मदत करण्याची संधी आम्ही आमचे भाग्य समजतो. कारण या सर्व सैनिकांमुळे आपण आणि आपला देश सुरक्षित आहे. व्हाईट आर्मीच्या लोकहिताच्या कामाला संजय घोडावत फाउंडेशन भविष्यातही सहकार्य देत राहील.
व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत सांगितले की, या पाठिंब्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या शेकडो युवकांना पोषक अन्नाची सुविधा उपलब्ध होऊ शकली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
64 %
2.1kmh
7 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page