Homeकला - क्रीडाडी. वाय.'च्या शिवम हवालदारची आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

डी. वाय.’च्या शिवम हवालदारची आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर :
कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद अंतर्गत झालेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत ४७ ते ५० या वजनी गटात डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या शिवम हवालदार याने द्वितीय क्रमांक पटकविला आहे. या यशामुळे आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
शिवम हवालदार हा डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पमध्ये सिव्हील विभागात द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत त्याने बॉक्सिंगमध्ये ठसा उमटवला. त्यामुळे आंतरविभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील , विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील,  कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर यांनी शिवम हवालदार व जिमखाना प्रमुख व्ही. बी. उतळे यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
64 %
2.1kmh
7 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page