कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालयाच्या महिला संघाने विविध मैदानी खेळ प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवून कोल्हापूर झोन व इंटरझोन उपविजेतेपद चॅम्पियनशिप मिळवली.
या संघामध्ये रिया पाटील एम.एस्सी. सी.एस- १, झोनल मैदानी स्पर्धेमध्ये ४०० मीटर धावणे सुवर्ण पदक तर इंटरझोनल ४०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये ५६.७५ इतक्या वेळेमध्ये स्पर्धा पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले. त्याचबरोबर मैदानी महिला गटामध्ये वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवून ती सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. तितिक्षा पाटोळे बी.ए.२ हिने झोन १०० मीटर धावणे सुवर्ण पदक, २०० मीटर धावणे सुवर्ण पदक, इंटरझोनल १०० मीटर धावणे सुवर्ण पदक तर २०० मीटर धावणे कांस्य पदक मिळविले. तन्वी जमसांडेकर बी.बी.ए. ३ हिने झोन २०० मीटर रौप्यपदक, तिहेरी उडी कांस्य पदक, तर इंटरझोनल स्पर्धेमध्ये तिहेरी उडी रौप्यपदक प्राप्त केले. रितिका मगदूम, एम. ए. २ हिने झोनल स्पर्धेमध्ये लांब उडीमध्ये सुवर्ण पदक, १०० मीटर कांस्य पदक, तर इंटरझोनल स्पर्धेमध्ये लांब उडी – सुवर्ण पदक मिळविले. गौरी भारती बी.एस.सी ३ हिने झोन व इंटरझोन थाळीफेक क्रीडाप्रकारात रौप्यपदक मिळविले. सानिका बोडके बी.एस.सी. १ हिने १०० मीटर हर्डल्स कांस्य पदक प्राप्त केले. श्रावणी जाधव बी.कॉम १ हिचा रिले संघात समावेश. तसेच या संघाने झोनल स्पर्धेत ४ × १०० मीटर रिले सुवर्ण पदक तर ४ × ४०० मीटर रिले सुवर्ण पदक मिळवले. तसेच इंटरझोनल स्पर्धेत ४ × १०० मीटर रिले सुवर्ण पदक प्राप्त केले.
या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
झोनल व इंटर झोनल मैदानी स्पर्धेत ‘विवेकानंद’चा महिला संघ उपविजेता
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
26.8
°
C
26.8
°
26.8
°
53 %
3.7kmh
53 %
Sun
30
°
Mon
31
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°

