कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या लिंगनूर (क.नूल) ता. गडहिंग्लज येथे जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, माजी आ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, एनडीडीबीचे प्रतिनिधी, प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला वाढती मागणी असल्याने म्हैस दूध संकलन मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे. अमूल डेअरीला टक्कर द्यायची असेल तर आपले दूध संकलन वाढलेच पाहिजे. २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, गोकुळने नेहमीच उत्पादकांचे हित जोपासले आहे. त्याचा एक भाग म्हणून जातिवंत म्हैस विक्री केंद्र उभारले आहे. गोकुळने सहकार क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवली आहे. गोकुळच्या या उपक्रमामुळे उत्पादकांचे हित संरक्षित राहणार असून, दूध व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल, तसेच शहरी-ग्रामीण भागामधील आर्थिक समन्वय वाढेल.
आमदार सतेज पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघाच्या दूध संकलन वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना परराज्यात जाऊन जनावरे खरेदी करणे परवडत नसल्यामुळे गोकुळने जातिवंत म्हैस खरेदी-विक्री केंद्र चालू केले आहे. दूध व्यवसाय नेहमीच फायदेशीर राहतो. त्याकडे नोकरीला पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे.
गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ व एन.डी.डी.बी. यांनी संयुक्तपणे उभे केलेल्या या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हैशी उपलब्ध होणार असून यामुळे म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितच चालना मिळणार आहे. या म्हैस विक्री केंद्रावरती खरेदी केलेल्या म्हैशींना संघ नियमानुसार गोकुळमार्फत ४० हजार रुपये अनुदान मिळणार असून त्यापैकी आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केलेनंतर तात्काळ दिले जाणार आहे. या म्हैस विक्री केंद्रामुळे खासकरून गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल या तालुक्यातील दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी उपलब्ध होणार आहेत. लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचे कलश पूजन करून लवकरच २५ लाख लिटरचा संकलनाच टप्पा पूर्ण करायचा आहे.
यावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक सौ. मंगल खन्नुकर (कोवाड), वैभव बुगाडे (गिजवणे), गजेंद्र बिरंबोळे (मडिलगे), शिवाजी हूनगीनाळे (बटकणंगले) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत एनडीबीबीचे प्रतिनिधी डॉ. सरोज वाहणे व प्रास्ताविक संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी केले. तर आभार संचालक शशिकांत पाटील- चुयेकर यांनी मानले. यावेळी गोकुळ संघाचे संचालकांसह पदाधिकारी, एनडीबीबीचे प्रतिनिधी डॉ. मोहम्मद तारिक, डॉ. बालाजी वडजे, संघाचे अधिकारी, पंचक्रोशीतील दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक उपस्थित होते.
——————————————————-
गडहिंग्लज येथे ‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्घाटन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
28 %
4.1kmh
0 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

