Homeराजकियकोल्हापूरात भाजपाचा आनंदोत्सव

कोल्हापूरात भाजपाचा आनंदोत्सव

कोल्हापूर :
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले. या विजयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजप कोल्हापूर च्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशांचा गजरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटत आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेला जनतेने दिलेला कौल आहे. मत चोरीचा खोटा निगेटिव्ह पसरवणारे या निकालामुळे उघडे पडले आहेत. समाजातील सर्वात वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे पक्षाचे ध्येय सातत्याने यशस्वी होत आहे, याचे हे द्योतक आहे. पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये मला देखील बिहार राज्यात निवडणुकीसाठी प्रचाराला जाता आले आणि आजचा या निकालाने मनस्वी आनंद होत आहे.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी, बिहार निकालाचा अश्वमेध महाराष्ट्रात देखील दिसेल असे सांगत कोल्हापुरात महायुतीचा महापौर होण्यासाठी या निकालातून सर्व कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन जोमाने कामाला लागावे असे सांगितले.
याप्रसंगी आमदार अमल महाडिक, विराज चिखलीकर, अमर साठे, धनश्री तोडकर, हेमंत आराध्ये, भरत काळे, आप्पा लाड, हेमंत आराधे, विजय अग्रवाल, अजित सूर्यवंशी, गिरीश साळुंखे, अतुल चव्हाण, हेमंत कांदेकर, संतोष माळी, राजसिंह शेळके, धीरज पाटील, विशाल शिराळकर, रविकिरण गवळी, सुनील पाटील, विनय खोपडे, विश्वजीत पवार, माधुरी नकाते, अनिल कामत, महेश यादव, आजम जमादार, विजय खाडे, उमा इंगळे, किरण नकाते, विशाल शिराळे, अशोक लोहार, संगीता तांबे, अमित पसारे, संजय जासूद, सचिन सुराणा, किसन खोत, कौस्तुभ वाईकर, अवधूत भाटे, योगेश कांगठाणी, शितल तिरुके, रूपाली आगळे, जयेश घरपणकर, सुभाष रामुगडे, दत्तात्रय मसवेकर, भूषण कानकेकर, रोहित कारंडे, अजिंक्य जाधव, सचिन घाडगे, प्रशांत अवघडे, शाहरुख गडवाले, प्रणवती पाटील, सचिन आवळे, ओमकार गोसावी, अमेय भालकर, संग्रामसिंह जरग, राहुल घाडगे, शिवप्रसाद घोडके, विश्वास जाधव, उदय इंगळे, विवेक कोरडे, राजाराम परीट, रिमा पालनकर, अश्विनी भास्कर, अश्विनी गोपुडगे, तेजस्विनी पार्टी, पद्मजा गुहागरकर, स्वाती कदम, सुशीला पाटील, तन्मय मेवेकरी, सुनील वाडकर, परवेज पठाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
28 %
4.1kmh
0 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page