कोल्हापूर :
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी श्वेता विश्वास काळे यांनी आज नामनिर्देशन अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने आणि शांत वातावरणात त्यांनी आपला अर्ज सादर केला.
अर्ज दाखल केल्यानंतर श्वेता काळे म्हणाल्या की, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिरोळ शहराच्या विकासाला वेग आला आहे. याच विकासाची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी मी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरली आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे आणि आधुनिक शिरोळ घडविणे हा माझा ध्यास आहे.
त्या पुढे म्हणाल्या, जनतेने मला एक संधी द्यावी, मी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ शहराचा कायापालट करेन. महिलांना रोजगाराच्या संधी, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देईन.
यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, विश्वास उर्फ दादा काळे, अभिजीत चुडमुंगे यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————-
श्वेता काळे यांचा शिरोळ नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
28 %
4.1kmh
0 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

