कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ इंटर झोनल टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेजने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात विवेकानंद कॉलेजने ५-३ ने के.आय.टी. कॉलेजवर विजय मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या इंटर झोनल टेबल टेनिस मुले व मुलींच्या स्पर्धांचे आयोजन विवेकानंद कॉलेजच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर या तीनही विभागातील एकूण ६० मुले व ६० मुली असे एकूण १२० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा साखळी फेरीतून बाद पध्दतीने खेळवण्यात आल्या. अंतिम सामना विवेकानंद कॉलेज विरुध्द केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर यांच्यात झाला. यामध्ये विवेकानंद कॉलेजने ५-३ ने के.आय.टी. कॉलेजवर विजय मिळवून विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचे उदघाटन व बक्षिस समारंभ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते पार पडला.
या स्पर्धेमधून गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा मुला-मुलींच्या टेबल टेनिस संघाची निवड करण्यात आली. याप्रसंगी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक डांगे-पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. योगिता परमाणे, स्पर्धा निरीक्षक रुद्रेश मल्लाप्पा हे उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————————————-
इंटर झोनल टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेज विजेते
RELATED ARTICLES
Mumbai
haze
23
°
C
23
°
23
°
60 %
2.1kmh
15 %
Tue
27
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
27
°

