Homeइतरअखेर बिबट्या जेरबंद

अखेर बिबट्या जेरबंद

कोल्हापूर :
येथील ताराबाई पार्क परिसरात सुमारे तीन तास खळबळ माजवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. अखेर बिबट्याला पकडल्यानंतर गुंगीचे इंजेक्शन देऊन वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आणि गाडीत घालून नेले आहे. दरम्यान, शहरात बिबट्या आल्याची चर्चा सुरू झाली आणि त्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात माळी, हॉटेल कामगार व वनरक्षक असे तीन जण जखमी झाले आहेत.
कोल्हापूर शहरात उच्चभ्रू वस्ती असलेल्या ताराबाई पार्क परिसरात भरदिवसा बिबट्या आला. येथील हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली. त्याठिकाणी माळी काम करत असलेल्या माळ्यावर त्याने हल्ला केला. यामध्ये माळी किरकोळ जखमी झाला. यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असेलला कामगार निखील कांबळे या युवकावरही हल्ला केला. वूडलँड हॉटेलमधून बिबट्याने बीएसएनल कार्यालयात उडी घेतली.
यानंतर बिबट्या महावितरण कार्यालयाच्या परिसरात शिरला. याठिकाणी सिव्हिल उप विभागाच्या मागील बाजूस बिबट्या दबा धरून बसला. दरम्यान त्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर याच्यावर बिबट्याने हल्ला केला. अखेर बिबट्या एका चेंबरमध्ये शिरला. चेंबरमध्ये शिरलेल्या बिबट्याला मात्र पकडण्यात यश आले. त्यानंतर गुंगीचे इंजेक्शन देऊन वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आणि गाडीत घालून नेले आहे.
ताराबाई पार्क परिसरात भरदिवसा बिबट्या निदर्शनास आला. या बिबट्याला पकडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, वन विभाग, अग्निशमन विभाग आदींनी अटोकाट प्रयत्न करत अखेर बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर आता हा बिबट्या शहरात कुठून व कसा आला, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
28 %
4.1kmh
0 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page