Homeकला - क्रीडाविवेकानंद कॉलेजच्या निहाली पाटीलची महाराष्ट्र संघात निवड

विवेकानंद कॉलेजच्या निहाली पाटीलची महाराष्ट्र संघात निवड

कोल्हापूर :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी मार्फत नुकत्याच डेरवण येथे १९ वर्षाखालील मुले व मुली या राज्यस्तर शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक व मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेतून विवेकानंद कॉलेजच्या ११वी सायन्समध्ये शिकणारी निहाली पाटील हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा जम्मू काश्मीर येथे होणार आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या संघात खालील खेळाडू सहभागी होते. मुलांच्या संघामध्ये ईशान सुभाष पटेल, केतन विनायक सुतार, वेदांत राजेंद्र पाटील, शिवम राजू गुप्ता, सोहम शिवकुमार चव्हाण तर मुलींच्या संघात निहाली निवास पाटील, माही पुष्कराज जनवाडकर, समीक्षा युवराज पोवार, समृद्धी संदिप हजारे या खेळाडूंचा समावेश होता.
या सर्व खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
28 %
4.1kmh
0 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page