Homeसामाजिकमुकेश अंबानी नाथद्वारामध्ये उभारणार ‘यात्री आणि वरिष्ठ सेवा सदन’

मुकेश अंबानी नाथद्वारामध्ये उभारणार ‘यात्री आणि वरिष्ठ सेवा सदन’

कोल्हापूर :
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी हिंदू धर्मातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीनाथजीची नगरी नाथद्वारामध्ये एक आधुनिक ‘यात्री आणि वरिष्ठ सेवा सदन’ उभारण्याची घोषणा केली आहे. त्यांनी श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेऊन ₹१५ कोटींचे दान दिले. यावेळी मुकेश अंबानी यांनी श्रीनाथजींची भोग-आरती केली आणि पूज्य गुरु विशाल बावा साहेब यांचे आशीर्वाद घेतले.
हे नवीन सेवा सदन तीर्थयात्री आणि वरिष्ठ वैष्णव भक्तांसाठी समर्पित असेल. येथे १०० पेक्षा जास्त खोल्या असतील, जिथे सुरक्षित आणि सन्मानपूर्वक निवासाची सुविधा मिळेल. तसेच २४ तासांची वैद्यकीय युनिट, नर्सिंग व फिजिओथेरपी सेवा, सत्संग व प्रवचन हॉल आणि पुष्टिमार्गातील थाळ-प्रसाद परंपरेनुसार भोजन व्यवस्था उपलब्ध असेल.
याप्रसंगी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, आपण वैष्णव आहोत याचा अभिमान बाळगायला हवा. आपण सनातन धर्म आणि आचार्य परंपरेचे अनुयायी आहोत.
या प्रकल्पाशी मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी थेट जोडले गेले आहेत. या प्रकल्पाचा उद्देश नाथद्वाराला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सेवा, सन्मान आणि भक्तिभावाने परिपूर्ण असे वातावरण प्रदान करणे आहे. सुमारे ₹५० कोटींच्या खर्चातून उभारला जाणारा हा सेवा सदन प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
याशिवाय, मुकेश अंबानी यांनी केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर मंदिरात दर्शन घेऊन ₹१५ कोटींचे दान दिले. तसेच आंध्रप्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानमध्येही त्यांनी भगवान श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
28 %
4.1kmh
0 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page