Homeकला - क्रीडाश्रेयस चव्हाणची महाराष्ट्र २३ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड

श्रेयस चव्हाणची महाराष्ट्र २३ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू श्रेयस चव्हाणची बीसीसीआय मार्फत घेतल्या जाणा­ऱ्या २३ वर्षाखालील राज्य स्पर्धेसाठी महाराष्ट्र २३ वर्षाखालील संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा एकदिवशीय साखळी पध्दतीची असुन या स्पर्धेतील सामने दि.९ ते २१ नोव्हेंबर २०२५ पर्यत रांची येथे खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धा महाराष्ट्र, बडोदा, उत्तराखंड, बिहार, पंजाब, बंगाल व छत्तीसगड या ७ राज्य संघात खेळविण्यात येणार आहे.
श्रेयस चव्हाण यापुर्वी सन २०१८-१९ मध्ये १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती सन २०१८-१९ यावर्षी विनू मकंड (एकदिवशीय) ट्राॅफीसाठी महाराष्ट्र संघात निवड सन २०२२-२३ व २०२४-२५ मध्ये २३ वर्षाखालील एकदिवशीय व चार दिवशीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती. तसेच इंडियन प्रिमीयर लीग २०२५ स्पर्धेच्या सौदी अरेबियात, जेहाद येथे झालेल्या मेगा लिलावासाठी निवड झाली आहे. आयपीएल लिलावासाठी निवड झालेला श्रेयस चव्हाण हा कोल्हापूरातील पहिलाच खेळाडू आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
29.9 °
27 %
3.1kmh
2 %
Tue
29 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page