Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पा

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पा

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून ज्येष्ठ फिजिशियन डॉ. राजेश ख्यालप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. राजेश ख्यालप्पा हे मागील २५ वर्षांपासून डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागात कार्यरत असून, त्यांनी विभागप्रमुख म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा या तिन्ही क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
डॉ. ख्यालप्पा यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक संशोधन प्रबंध सादर केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम.डी. पदवी संपादन केली आहे. उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, अध्यापनाचा समृद्ध अनुभव असलेले डॉ. ख्यालप्पा यांनी भारत सरकारच्या DAE-BRNS सह विविध निधी संस्थांकडून ३२ लाखांहून अधिक निधीसह संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय मंडळांवर त्यांनी सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. अधिष्ठाता म्हणून  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संशोधनवृद्धी आणि अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष भर देणार असल्याचे  डॉ. ख्यालप्पा यांनी सांगितले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी डॉ. ख्यालप्पा यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. पाटील म्हणाले, डॉ. ख्यालप्पा यांच्या नेतृत्वाखाली डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज नवी उंची गाठेल. संशोधन आणि रुग्णसेवेत महाविद्यालय नवे मानदंड प्रस्थापित करेल याचा विश्वास वाटतो.
यावेळी यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले,रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, आय. क्यू. ए. सी. डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, सीएचआरओ श्रीलेखा साटम, मेडिकल कॉलेज उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, प्राचार्य अमृत कुंवर रायजादे, डॉ. सी. डी. लोखंडे,  डॉ. चंद्रप्रभू जंगमे, रुधिर बारदेस्कर, डॉ. अजित पाटील, डॉ. आर. एस. पाटील, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
29.9 °
27 %
3.1kmh
2 %
Tue
29 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page