Homeसामाजिकरंकाळा तलाव पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरणार

रंकाळा तलाव पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरणार

• संध्यामठ संवर्धन व सेल्फी पॉईंट उभारण्यासाठी रु.२ कोटींचा निधी मंजूर
कोल्हापूर :
गेल्या अडीच वर्षात रंकाळा तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरणाकडे गांभीर्याने लक्ष देवून रंकाळ्याचे रूप पालटण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. सुशोभिकरण संवर्धनासाठी रु.२५ कोटी, म्युझीकल फाउंटेन उभारण्यासाठी रु.५ कोटी निधी देवून सुशोभीकरणास चालना दिली आहे. कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. आगामी काळात कोल्हापुरात येणारा प्रत्येक व्यक्ती रंकाळा तलावास भेट देईल, अशी आशा व्यक्त करत रंकाळा तलाव पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२५-२६ अंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून रंकाळा तलावातील संध्यामठ वास्तू संवर्धन व पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यास रु.२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले कि, कोल्हापूर शहरास ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. श्री अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव हे देशभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणारे प्रेक्षणीय स्थळ आहे. या तलावाचा इ. स. ८०० ते ९०० च्या कालावधीपासूनचा इतिहास पहावयास मिळतो. कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा रंकाळा तलाव म्हणजे “कोल्हापूरची चौपाटी आणि कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह” म्हणून ओळखला जातो. रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी गेल्या तीन वर्षात एकूण रु.३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर संध्यामठ वास्तूचे संवर्धन करून मुंबईतील गिरगाव चौपाटी  येथील सेल्फी पॉईंट (दर्शक गॅलरी) उभारण्यात येणार आहे. यामुळे आगामी काळात रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडणार असून, पर्यटन वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे.  रंकाळ्याचा ऐतिहासिक वारसा जपत विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे रंकाळ्याच्या वैभवात आणखी भर पडणार असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
——————————————————-
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
47 %
2.1kmh
0 %
Tue
26 °
Wed
27 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page