Homeशैक्षणिक - उद्योग जिओचा रेकॉर्डब्रेक IPO येणार

जिओचा रेकॉर्डब्रेक IPO येणार

कोल्हापूर :
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे मूल्यांकन तब्बल १७० अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज गुंतवणूक बँकर्सनी व्यक्त केला आहे. या संभाव्य मूल्यांकनामुळे जिओ भारतातील सर्वात मोठ्या दोन किंवा तीन कंपन्यांपैकी एक ठरू शकते. हे मूल्यांकन भारती एअरटेलसारख्या कंपन्यांपेक्षा खूपच जास्त आहे. सध्या एअरटेलचे मूल्यांकन सुमारे १२.७ लाख कोटी रुपये (१४३ अब्ज डॉलर्स) इतके आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा IPO हा २००६ नंतर रिलायन्स समूहातील कोणत्याही मोठ्या युनिटचा पहिला सार्वजनिक IPO असेल. २००६ मध्ये रिलायन्स पेट्रोलियमची लिस्टिंग करण्यात आली होती.
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, गुंतवणूक बँकर्सनी जिओसाठी १३० अब्ज ते १७० अब्ज डॉलर्स दरम्यानचे मूल्यांकन सुचवले आहे. या संदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे, परंतु अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यापूर्वी देशातील आघाडीच्या ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने सप्टेंबर २०२७ मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या इक्विटी व्हॅल्यूला वाढवून १४८ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ऑगस्ट महिन्यात सांगितले होते की, जिओची लिस्टिंग २०२६ च्या पहिल्या सहामाहीत होऊ शकते. अंबानी २०१९ पासूनच जिओच्या संभाव्य IPO बद्दल बोलत आहेत. २०२० मध्ये मेटा प्लॅटफॉर्म्स (फेसबुक) आणि अल्फाबेट (गूगल) यांसारख्या कंपन्यांनी जिओमध्ये १० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली होती. सप्टेंबरअखेर जिओकडे सुमारे ५०.६ कोटी ग्राहक होते आणि प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) २११.४ रुपये होता. या संपूर्ण प्रकरणावर रिलायन्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
27 ° C
27 °
27 °
78 %
2.6kmh
40 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
26 °

Most Popular

You cannot copy content of this page