Homeकला - क्रीडारॉयल रायडर्सचा दबदबा!

रॉयल रायडर्सचा दबदबा!

• ओंकार बुधले व श्रीजय अथणे यांची यशस्वी कामगिरी
कोल्हापूर :
इनड्युरन्स डर्ट ट्रॅक रेसिंग स्पर्धेत ६५० सीसी क्लासमध्ये ओंकार बुधले आणि ५०० सीसी क्लासमध्ये श्रीजय अथणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत रॉयल रायडर्स क्लबच्या रेसिंग टीमने ३ स्पर्धांपैकी २ स्पर्धांमध्ये सर्वोच्च यश मिळवत आपला दबदबा निर्माण केला.
कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी व जयसिंगपूर परिसरातील सुमारे २०० बुलेटस्वारांचा रॉयल रायडर्स हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोटारसायकल क्लब आहे. नुकत्याच ठाणे येथे झालेल्या वेस्ट कोस्ट रायडर्स मीट या कार्यक्रमात क्लबच्या ३० रायडर्सनी सहभाग नोंदविला. तसेच देशभरातून ६०० हून अधिक रायडर या इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते.
ठाणे येथे झालेल्या इनड्युरन्स डर्ट ट्रॅक रेसिंग स्पर्धेत रॉयल रायडर्स क्लबच्या रेसिंग टीमने विशेष प्राविण्य दाखवत ३ स्पर्धांपैकी २ स्पर्धांमध्ये सर्वोच्च यश मिळवले. यावर्षी प्रथमच ही स्पर्धा इनड्युरन्स पध्दतीने घेण्यात आली. तसेच पावसामुळे ट्रॅक खराब झाल्यामुळे रायडर्सचा या स्पर्धेत कस लागला. रॉयल रायडर्स क्लबच्या ओंकार बुधलेने ६५० सीसी क्लासमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच श्रीजय अथणे याने ५०० सीसी क्लासमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेमध्ये या दोघांव्यतिरिक क्लबचे रायडर महेश चौगुले आणि रायडर हर्ष तेजम यांनीही सहभाग घेतला होता. रायडर्सना वेस्ट कोस्ट रायडर्स मीटचे मॉडरेटर जयदीप पवार व अभिजीत काशिद आणि रॉयल रायडर्स क्लबचे टीम मॅनेजर सचिन घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
27 ° C
27 °
27 °
78 %
2.6kmh
40 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
26 °

Most Popular

You cannot copy content of this page