कोल्हापूर :
ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए १४ वर्षाखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सारा फेंगसे, अंशुल पुजारी, सानवी मोहन यांनी मानांकित खेळाडूंना पराभूत करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अंशुल पुजारीने अव्वल मानांकित हिमाचल प्रदेशच्या अभिनव शर्माचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. यशवंतराजे पवारने आपला राज्य सहकारी तक्षशील नगरचा ६-४, ६-३ असा पराभव केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या सारा फेंगसे हिने अव्वल मानांकित शरण्या सावंतचा ६-३, ६-३ असा तर, कर्नाटकच्या सानवी मोहनने बाराव्या मानांकित तेलंगणच्या श्रेष्ठा दुग्यालाचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
——————————————————-
टेनिस स्पर्धेत सारा फेंगसे, अंशुल पुजारी, सानवी मोहन यांचा मुख्य फेरीत प्रवेश
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22
°
C
22
°
22
°
43 %
3.1kmh
6 %
Sat
27
°
Sun
26
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

